Homeक्राईमसोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

सोरतापवाडी फाटा येथे भीषण अपघात; हायवा डंपरच्या टायरखाली तरुणाचा जागीच मृत्यू

✍️नितीन करडे |

उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) दुपारी भीषण अपघात घडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा टायरच्या हायवा डंपरच्या टायरखाली चिरडल्याने हा मृत्यू झाला.

या अपघातात विक्रम दयानंद सूर्यवंशी (वय १९ वर्ष, रा. बोरीऐंदी फाटा, ता. दौंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजण्याच्या दरम्यान सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतून मुरूम भरून येणारा दहा टायर हायवा (क्र. एमएच १२ वाय क्यू ५७९७) सोरतापवाडी फाट्यावर पुण्याच्या दिशेने वळण घेत होता. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एक्टिवा (क्र. एमएच २४ बी झेड ८३५६) वरून येणारा विक्रम सूर्यवंशी याचा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की, हायवाच्या डाव्या बाजूच्या टायरखाली सापडून विक्रम च्या डोक्यावरून टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका आणि चालक संतोष झोंबाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत तरुणाला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

” पुणे सोलापूर महामार्गावरील सहजपूरफाटा–कुंजीरवाडी दरम्यान वाढले अपघात, निष्काळजीपणा की व्यवस्थेचा अभाव? महामार्गावरील ठरत आहे अपघाताचे हॉटस्पॉट ?”

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश भोसले, पोलीस कर्मचारी सुमित वाघ व रवीकुमार फड यांनी काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी हायवा चालक सुनील जगन्नाथ शिंगटे (वय ५०, रा. सोरतापवाडी) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांनी पुन्हा एकदा संताप व्यक्त केला आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र (डिपी) ४८ तासात बसवले!

पेरणेत दीड महिन्यांपासून बंद असलेले वीज रोहीत्र(डिपी) ४८ तासात बसवले. प्रदिप वसंत कंद यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लोणीकंद प्रतिनिधी : पेरणे (ता.हवेली) येथे विजय रणस्तंभ...

error: Content is protected !!