Homeताज्या बातम्यालोणी काळभोर पोलीसांनी अट्टल घरफोडी चोरास परराज्यातून केले अटक; ६,३९,९०० रुपयांचा मुद्देमाल...

लोणी काळभोर पोलीसांनी अट्टल घरफोडी चोरास परराज्यातून केले अटक; ६,३९,९०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

✍️ नितीन करडे

पुणे: लोणी काळभोर पोलीसांनी ९ दिवसांचे आत अट्टल घरफोडी चोरास खंडवा, मध्यप्रदेश येथुन अटक केले आहे. व आरोपीकडुन ६,३९,९००/- रुपयांचे सोन्याचे दागीने, रोख रक्कम व मोबाईल केला जप्त केला आहे.

ता. १२ जुलै रोजी शौकत शब्बीर मोगल वय ४३ वर्षे रा. गल्ली नंबर २, पठारे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, पुणे हे त्यांचे कुटुंबीयांसह त्यांचे राहते घरास कुलुप लावुन गावी गेले होते. ता. १४ जुलै रोजी ते घरी परत आले असता, त्यांचे राहते घराचे कुलूप तुटलेले व घरातील कपाटाचे लॉक उचकटलेले दिसले आणि त्यातील सोन्याचे दागीने, रोख रक्कम, मोबाईल चोरीस गेल्याचे त्यांचे लक्षात आले. त्याबाबत त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणेत अज्ञात चोरटयाविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील तपास पथकाचे अंमलदार पो. शि. पाटील व पो. शि. कुदळे यांना त्यांच्या गोपनिय बातमीदारामार्फत प्राप्त झाले माहितीचे अनुषंगाने, लोणी काळभोर पोलीसांनी तांत्रीक पुराव्यांची पडताळणी करुन, अज्ञात आरोपीचे ठावठिकाणाबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त केली. त्यावरुन सदर चोरी इसम नामे प्रतिक हिराचंद लिडकर वय ३१ रा. शिवमंदिर शेजारी रामनगर, खंडवा, ता. जि. खंडवा, मध्यप्रदेश राज्य याने केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व परवानगीने लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक खंडवा, मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले.

आरोपीच्या भागातील रहिवासीतांकडुन माहिती घेवुन आरोपी राहत असलेल्या भागात सापळा रचुन आरोपीस लोणी काळभोर पोलीसांनी खंडवा, मध्यप्रदेश येथुन ता. २३ जुलै रोजी ताब्यात घेवुन, त्यास दाखल गुन्हयात अटक केले. त्या अटक आरोपीविरुध्द मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरी अशाप्रकारचे एकुण १५ गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीकडे, अटक मुदतीत पोलीस कस्टडी दरम्यान तपासी अधिकारी
कृष्णा बाबर, सहा. पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर पोलीस ठाणे यांनी तपास करुन आरोपीने गुन्हयातील चोरुन नेलेले सोन्याचे दागीने रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट असा एकुण ६,३९,९००/- रुपयांचा माल आरोपीकडुन जप्त केला आहे.अशाप्रकारे अतिशय कौशल्यपुर्ण व प्रभावीरित्या तपास करुन लोणी काळभोर पोलीसांनी घरफोडी सारखा गंभिर गुन्हा, बाहेर राज्यातील आरोपी असताना देखील केवळ ९ दिवसाच्या आत उघडकीस आणुन, गुन्हयातील चोरीस गेलेला १०० टक्के माल आरोपीकडुन जप्त केला आहे. वास्तवीक पाहता सदर गुन्हा अज्ञात आरोपीतांविरुध्द दाखल असताना तसेच सदर बाहेर राज्यातील आरोपीबाबत कसलीही माहिती प्राप्त नसताना देखील, लोणी काळभोर पोलीसांनी अविरत प्रयत्न व कौशल्यपुर्णरित्या तपास करुन, आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. तसेच आरोपीकडुन चोरीस गेलेला सर्व ऐवज जप्त करुन, गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहा. पोलीस निरीक्षक कृष्णा
बाबर, पो. हवा. सातपुते, वणवे, भोसले, माने, जगदाळे, देवीकर, पो. शि. बाजीराव विर,पाटील, शैलेश कुदळे, कुंभार, गाडे, कर्डीले, सोनवणे, शिरगिरे, दडस, म.पो.शि. थोरात यांनी तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर यांचे कार्यालयास नेमणुकीस असलेले पो. शि. अमोल जाधव यांनी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांची मोठी कारवाई; ३४ सराईत आरोपींवर हद्दपारची कारवाई  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी यवत पोलिसांचा कडक पवित्रा; गुंडगिरी, अवैध धंदे व कायदा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप ! ✍️ नितीन...

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

error: Content is protected !!