Homeक्राईमपत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची पती कडून हत्या , ५ जणांना पोलीसांनी...

पत्नीशी अनैतिक संबंध असलेल्या तरुणाची पती कडून हत्या , ५ जणांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या 

✍️नितीन करडे

उरुळी कांचन : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे हददीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा लागला असून सदर खुन पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याने पतीसह पाच जणांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह पाच जणांना जेरबंद केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) याचा खुन केल्याप्रकरणी योगेश दादा पडळकर, (वय २५), पत्नी (वय २३, दोघे रा. माळशिरस ता. पुरंदर जि. पुणे) या पत्नी समवेत भाऊ विकास आश्रुबा कोरडे (वय २१, रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) तसेच विकास यांचे मित्र शुभम उमेश वाघमोडे (वय २२, रा. मुरुड ता. जि. लातूर) व काकासाहेब कालिदास मोटे (वय ४२, रा. येवती ता. जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की २७ जुन रोजी सकाळी ९ वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) यवत गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एक अनोळखी इसम, वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार हत्याराने हल्ला करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून ठार मारले आहे. अशी अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथे लखन सलगर हे हरवले असल्याचे समजले. त्यात अधिक तपासांत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी मिळालेला मृतदेह हा लखन सलगर यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

त्या गुन्ह्याचा तपास केला असता त्यात लखन व राजश्री यांचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. या कारणांमुळे वरिल पाच जणांनी लखन यांस भुलेश्वर पायथ्याला नेऊन तीव्र धारदार तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले.

यासंदर्भातील कबुली त्यांनी दिली.आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी ११ जुलै रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करित आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे (स्था.गु. शा), महेश माने, प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार मोमीन शेख, अजित भुजबळ, अजय घुले, धिरज जाधव, यांचे समवेत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप देवकर, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, नारायण वलेकर, गणेश कर्चे, सुनिल नगरे, विनायक हाके, संतोष कदम, प्रमोद गायकवाड, परशुराम म्हस्के, प्रमोद शिंदे, वैभव भापकर, मारूती बाराते, विनोद काळे, दिपक वेताळ, प्रणव ननवरे, प्रतिक गरूड, शुभम मुळे, सचिन काळे, मोहन भानवसे, स्वप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!