वाघोली पोलीसांची दमदार कामगिरी रेसिंग करणाऱ्या चालकावर कारवाई करुन गाडया केल्या जप्त
पुणे : वाघोली पोलीस स्टेशन हददीतील न्याती एलान सेंट्रल साऊथ सोसायटी वाघोली येथे अंतर्गत रोडवर दोन गाडयामध्ये रेसंग करित असल्याची माहीती मिळताच वाघोली पोलीसांनी धाव घेवुन रेसिंग करणा-या महिंद्रा कंपनीची थार गाडी नंबर एम.एच.१२- व्ही.क्यू .८२१८ व महिद्रा कंपनीची स्कॅर्पीओ गाडी नंबर एम.एच.-१२-एक्स.एक्स.४९५१ या दोन्ही चालकासंह ताब्यात घेवुन दोन्ही गाडयांवर वाहतुक शाखा, वाघोली पुणे यांनी कारवाई केली आहे. सदरची कामगिरी हिम्मत जाधव पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली युवराज हांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस ठाणे, पुणे शहर , मनोज बागल , पोलीस उप निरीक्षक वाघेाली पो स्टे पुणे. वाघोली वाहतुक विभाग, प्रभारी अधिकारी गजानन जाधव यांनी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून पोलीसांचे कौतुक होत आहे.























