पञकार- नितीन करडे
पुणे : प्रवासाच्या बहाण्याने इरटीगा कारमध्ये बसुन कार चालकास मारहाण करत त्यांचा खुन करणाऱ्या सराईत अंतर जिल्हा टोळीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीसांनी आवळल्या आहेत. आळेफाटा पोलीस स्टेशन येथे दि. २८ जानेवारी रोजी लुटमार व खुन असा गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी अंकुश राजेश गायकवाड रा. निधी अपार्टमेंट जेलरोड, जि. नाशिक यांचे वडील नामे राजेश बाबुराव गायकवाड, वय ५६ वर्ष व्यवसाय चालक हे दि. २७ जानेवारी रोजी नाशिक येथून तते इरटीगा कार नं. एम.एच. १५ जे. डी. ४१९३ ही घेवून पुणे येथे गेले होते., रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजेश गायकवाड यांच्या फोनवरून फियांदीचे आईंचे फोन वर फोन आला व राजेश गायकवाड यांचा फोन पुणे-नाशिक हायवेलगत संतवाडी रोडवर मिळाला असून फोन समाधान हॉटेल येथे आहे. या माहितीचे आधारे फियांदी व कुटुंबीय हे आळेफाटा येथे आले त्यांनी राजेश गायकवाड यांचा शोध घेतला, ते मिळुन न आल्याने दि.२८ जानेवारी रोजी मिसींग तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविण्यात आली. त्यानंतर सकाळी ०९ वाजण्याच्या दरम्यान संतवाडी परिसरात चालक राजेश गायकवाड, यांचा मृतदेह मिळून आला. यात त्यांचे दोन्ही हात पाटीमागे बांधलेले अवस्थेत होते.
गुन्हा उघडकीस आण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण यांनी स्था.गु.शा.चे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पथकास सुचना करून सीसी टीव्ही फुटेज तपासणी च्या सुचना केल्या. त्याप्रमाणे स्था.गु.शा.चे पथकाने आळेफाटा पो स्टे चे तपास पथकाचे मदतीने तपास सुरू करून मृतदेह मिळुन आलेल्या रोडवरील सिसी टीव्ही फुटेज तपासले असता, नाशिक ते पुणे लेनलगतचे हॉटेलच्या सीसी टीव्ही मध्ये मयत राजेश गायकवाड यांचेकडील इरटीगा कार ही विरूद्ध दिशेने जावून मृतदेह फेकून दिलेल्या ठिकाणी गेली व पुन्हा माघारी आळेफाटा बाजूकडे जावुन माळशेज घाटाकडे गेली होती. तपासा दरम्यान राजेश गायकवाड यांची इरटीगा कार चाळकवाडी टोलनाक्यावरून नाशिक कडे जाताना कार मध्ये त्यांचे व्यतिरीक्त आणखी दोन इसम बसलेले होते व एका व्यक्तीचे डोक्यात पांढरे रंगाची कॅप होती. त्याद्वारे चाकण चौकातील नाशिककडे जाणारे गाडीतळावर जावून चौकशी केली असता, पांढरे रंगाची कॅप घातलेल्या इसमा सोबत इतर तीन व्यक्ती असल्याचे आढळून आले दरम्यान इरटीका कार ही कसारा घाटात मिळून आल्याने सदरचे आरोपी हे नाशिक परिसरातीलच असावेत असा संशय आल्याने पथकाने त्या परिसरातील गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळविली गुन्हयातील फुटेज मधील व्यक्ती ही युवराज मोहन शिंदे रा. सातपूर, नाशिक व विशाल आनंदा चव्हाण रा., गंगापूर.कॉलेज रोड नाशिक हे असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असलेबाबत माहिती मिळाली, माहितीचे आधारे संशयितांचा शोध घेतला असता, माळशेज घाटाजवळ सापळा रचुन ३१ जानेवारी रोजी आरोपी
१) विशाल आनंदा चव्हाण वय २२, रा, गंगापूर रोड, बिगबाजार बॅकसाईंट, महेश अपार्टमॅंट कॉलेज रोड, नाशिक, २) मयुर विजय सोळसे, वय २३, गंगापूर रोड, गोकुळवाडी ग्रीरंगनगर, नाशिक, ३) ऋतुराज विजय सोनवणे, वय २१ रा. गंगापूर रोड, विदया विकास सर्कल, गोकुळवाडी, नाशिक अशी आहेत
त्यांचेकडे चौकशी करता त्यांनी नाशिक जाण्यासाटी प्रवासी म्हणून कार मध्ये बसले आणि आळेफाटयाजवळ राजेश गायकवाड यांचा कारमध्येच गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह टाकून देवून कार घेवनू निधून गेले असल्याचे सांगितले. आरोपींना विश्वासात घेवून चौकशी करता यातील मुख्य आरोपी युवराज मोहन शिंदे याने यापुवीं त्याचे इतर साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारे गुन्हे करून एक इरटीगा कार जबरदस्तीने चोरून नेली असून त्याबाबत चाकण पो स्टेशन येथे गुन्हा नोंद आहे.सदरचे आरोपी हे सराईत असुन आरोपी विशाल चव्हाण व मयुर सोळसे यांचेवर गंगापूर नाशिक येथे चोऱ्यासारखे अनेक गुन्हे दाखल आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीकारी रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी रविद्र चौधर, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोस्टेचे पो नि दिनेश तायडे, स्था.गु.शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, पोसई अमित सिदपाटील आळेफाटा पो स्टे सपोनि अमोल पन्हाळकर, पोशिई चंद्रशेखर डंबरे, स्था.गु.शा.चे अंमलदार दिपक साबळे, राजु मोमीण संदिप वारे, अक्षय नवले विक्रम तापकीर, निलेश सपेकर, आळेफाटा पोस्टेचे अंमलदार विनोद गायकवाड, अमित माळंजे, सचिन कोबल,आदीनी ही कामगिरी केली आहे.























