नितीन करडे✍️
पुणे: दौंड मधील एका इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्याने पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थीनीवर आधी बलात्कार करावा नंतर तिचा खून करावा यासाठी १०० रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलाची बदनामी करण्याच्या हेतूने सुपारी दिल्याचे सांगत तिला मानसिक त्रास देत तिचे शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक वर्गशिक्षक आणि शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयन्त
दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड; अल्पवयीन विद्यार्थीनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल























