या मच्छिमारांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान बांगलादेशच्या प्रादेशिक पाण्यात घुसखोरी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शेजारच्या बांगलादेशातील तुरुंगातून नुकत्याच सुटलेल्या राज्यातील 95 मच्छिमारांचा सन्मान करणार आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या सत्कार समारंभात मुख्यमंत्री मच्छिमारांना काही नुकसानभरपाईही देतील अशी दाट शक्यता असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, बांगलादेशच्या प्रादेशिक पाण्यात घुसखोरी केल्याच्या आरोपावरून या मच्छिमारांना ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान अटक करण्यात आली होती.
एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “मुख्यमंत्री बांगलादेश सरकारने सोडलेल्या मच्छिमारांचा सन्मान करतील. त्यापैकी बहुतांश काकडद्वीप येथील तर काही जिल्ह्यातील नामखाना येथील रहिवासी आहेत.
जिल्हा प्रशासनाने आतापासूनच सर्व तयारी केली असून सागर बेटावरील हेलिपॅडजवळ स्टेज तयार करण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, रविवारी सायंकाळी 95 मच्छिमारांना सागर बेटावर आणण्यात आले.























