Homeताज्या बातम्या3 लाख 35 हजारांच्या चोरीतील आरोपीला अवघ्या तीन तासात बार्शी पोलीसांनी केले...

3 लाख 35 हजारांच्या चोरीतील आरोपीला अवघ्या तीन तासात बार्शी पोलीसांनी केले जेरबंद

3 लाख 35 हजारांच्या चोरीतील आरोपीला अवघ्या तीन तासात बार्शी पोलीसांनी केले जेरबंद, बार्शी शहर पोलिसांची दमदारी कामगिरी !

✍️ नितीन करडे

प्रतिनिधी : बार्शी शहर पोलिसांनी आपल्या तत्परतेने आणि तांत्रिक कौशल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. अवघ्या 3 तासात 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणातील आरोपी नागेश राजू बगाडे (वय 32, रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी) याला चोरीच्या मुद्देमालासह जेरबंद केले आहे. या यशस्वी कारवाईमुळे पोलिसांविषयी नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना वाढली आहे, तर गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. दि. 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6:15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवासे हे भगवंत मंदिरात असताना त्यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने उघड्या दारातून प्रवेश केला. आणि घरातील तिजोरी फोडून 3 लाख 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी पोहेकॉ/488 साठे यांच्याकडे सोपवण्यात आली. गुन्हा नोंदवताच बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाला कामाला लावले. पथकाने अथक परिश्रम आणि अचूक नियोजनासह बार्शी शहरातील सीसीटीव्ही फुटेज यांचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या ३ तासांत आरोपी नागेश राजू बगाडे याला चोरीच्या संपूर्ण मुद्देमालासह रिंग रोड बार्शी ता. बार्शी यथुन ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रियत यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पोसई उमाकांत कुंजीर, सपोफी अजित वरपे, पोहेकॉ माने, डबडे, साठे, पोकॉ फत्तेपुरे, जाधव, पवार, उदार, देशमुख, नितनात, बहिरे, शेख, उघडे आणि भांगे यांनी मोलाची कामगिरी बजावली. तसेच पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पथकाचे अभिनंदन केले. व “आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलिस पथकाच्या समर्पित प्रयत्नांमुळे आम्ही गुन्हेगारांना त्वरित पकडण्यात यशस्वी ठरलो. यामुळे बार्शी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा विश्वास दृढ होईल असे सांगितले. व बार्शी शहर पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे. तसेच नागरिकांनी घरातून बाहेर पडताना दार-खिडक्या सुरक्षित ठेवाव्यात आणि संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 किंवा 112 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती; उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप...

रात्रगस्तीत पोलिसांची माणुसकी; रस्त्यावरच महिलेची प्रसूती उरुळी कांचन पोलिसांच्या तत्परतेने ऊसतोड कामगार महिलेची सुखरूप प्रसूती; आई व बाळ सुखरूप उरुळी कांचन, (ता. हवेली) : रात्रीच्या वेळी...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा...

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

error: Content is protected !!