Homeक्राईमयवत येथील चोरीसह खून करून पसार झालेले परप्रांतीय आरोपी १२ तासाच्या आत...

यवत येथील चोरीसह खून करून पसार झालेले परप्रांतीय आरोपी १२ तासाच्या आत पोलिसांच्या ताब्यात

✍️नितीन करडे

पुणे : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघां जणांची टोळी जेरबंद करून १२ तासांचे आत गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना कौतुकस्पद कामगिरी केली आहे. दौंड तालुक्यातील यवत पो स्टे हद्दीतील सहकारनगर परिसरात गहणारे निळकंठेश्वर मंदिराजवळील विश्वजीत शशीकांत चव्हाण यांचे राहते घरात तीन जणांनी घरात घुसून झोपलेल्या दोन पुरुष व दोन महिलांना मारहाण करणेत आली व सोन्याचे दागिने चोरी करणेत आलेले आहेत. चोरटयांनी केलेल्या मारहाणीत विश्वजीत शशिकांत चव्हाण वय ३३ वर्षे हे मयत झालेले असून इतर सदस्य हे गंभीर जखमी झाले असून सदर प्रकाराबाबत यवत पो स्टेशन येथे दि. ०६ मार्च रोजी गुन्हा नोंदविणेत आला होता.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू करणेत आला, सदर गुन्हयाचे ठिकाणी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून यवत पो स्टे ची दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सुचना केल्या. सदर गुन्हयाचे अनुषंगाने नेमलेल्या तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, घटना झालेनंतर यातील फिर्यादी यांनी परिसरातील लोकांना मदतीस बोलाविले होते, त्यापैकी दोन व्यक्तींनी चोरटयांचा पाठलाग करत असताना चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रूळाकडे पळून गेल्याचे सांगितले. सदर व्यक्तींकडे केलेल्या चौकशीत तसेच त्या परिसरात शोध घेतला. यात आरोपी पळून गेलेल्या भागात एक संशयित बॅग मिळून आली त्यामध्ये कपडे व इतर साहित्य मिळाले. त्यात एका जर्कीगवर युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहीलेले होते. त्या आधारे आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान चार संशयित इसम हे पुणे स्टेशन कडे गेल्याचे बातमी गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना येरवडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅव्हल्स स्टॉपवर दोन संशयित इसम मिळून आले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता हालचाल करू लागल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी करता त्यांनी त्यांचे नाव
१ ) सलमान दिलशाद शेख वय २८ वर्षे रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद जवळ, बडौत ता. जि. बागपथ राज्य – उत्तर प्रदेश
२) मोमीन अकबर शेख वय – ४५ रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद, जवळ बडौत ता. जि. बागपथ राज्य- उत्तर प्रदेश अशी असल्याची सांगितले.
त्यांनी त्यांचे साथीदार नामे

३) रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर वय २६ धंदा- रा. बडौत जि. बागपथ राज्य – उत्तर प्रदेश
४) गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय २५ धंदा – गुराळ कामगार रा. काशीराम कॉलनी बडौद ता. जि. बागपथ राज्य- उत्तर प्रदेश

यांचे मदतीने घडलेला गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच यातील इतर दोन आरोपी रावतसिंग चौधरी व गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान हे घटनास्थळाचे परिसरात त्यांची पडलेली बॅग शोधायला गेले असल्याचे सांगितल्याने त्यांना शोधण्यासाठी यवत पोस्टे चे पथक व स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

ही कौतुकपद कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल गावडे, सपोनि दत्ताजीराव गावडे, सपोनि कुलदीप संकपाळ, यवत पोलीस स्टेशनचे सपोनि प्रवीण सपांगे, मसपीनि सुवर्णा गोसावी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजीत सावंत, पोसई अमित सिद-पाटील, पोसई किशोर वागज, पीसई सलीम शेख, सहा. फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंडे, सचिन घाडगे, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरंदे, पोलीस हवा रामदास बाबर, विजय कांचन, अभिजीत एकशिंगे, राहुल पवार, राहुल मुंब, मंगेश थिगळं, योगेश नागरगोजे, रणजित कोंडके, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास, तुषार भोईटे, पो अमं मंगेश भगत, निलेश शिंदे, अजय मुले, अतुल डेरे, बिभीषण सस्तुर, गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, अक्षय यांदव, दत्ता जय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, विशाल जावळे, प्रमोद गायकवाड, मारुती बागते, प्रणव ननवरे यांच्या पथकांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आळंदी PMPML बस स्थानकात भीषण अपघात

बसच्या मागील चाकाखाली आल्याने अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ (✍️अर्जुन मेदनकर)  आळंदी प्रतिनिधी :आळंदी येथील गजबजलेल्या PMPML बस स्थानकात सोमवार (दि. ११ मे) दुपारी अडीच...

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त

उरुळी कांचनमध्ये पुन्हा वाहतूक कोंडीचा विस्फोट; नागरिक, व्यापारी, संतप्त ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी: पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन Uruli Kanchan परिसरात वाहतूक कोंडीने पुन्हा डोके...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत...

भर उन्हाळ्यात चौफुला येथे दोन तासांहून अधिक वाहतूक कोंडी; नागरिक त्रस्त; वाहतूक पोलीस आहेत तरी कुठे ? नागरिकांचा सवाल  ✍️ नितीन करडे दौंड, प्रतिनिधी : दौंड...

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई

मोक्का गुन्ह्यातील ६ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद; पुणे ग्रामीण एटीएसची धडाकेबाज कारवाई ✍️ नितीन करडे पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अत्यंत कौशल्यपूर्ण...

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी!

शेतकरी कुटुंबातील नामदेव खैरे यांची पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड; जिद्द आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी ✍️नितीन करडे  पुणे (प्रतिनिधी): जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर शेतकरी...

error: Content is protected !!