महामार्गावरील दुभाजकाची तुटलेली जाळी हटवली; पुणे बुलेटीन न्यूज चा इफेक्ट
✍️ नितीन करडे
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात पुणे–सोलापूर महामार्गावरील दुभाजकावरील लोखंडी जाळी तुटून रस्त्यावर पडली होती. त्या पडलेल्या जाळीमुळे दोन अपघात झाले होते. शेजारीच उरुळी कांचन एसटी स्टँड असल्याने ये -जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. अशी बातमी ” पुणे बुलेटिन न्यूज “ ने प्रसिद्ध केली होती.
बातमी प्रसिद्ध होताच संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घेत अपघाताचा धोका लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व तुटलेली जाळी सुरक्षितरीत्या हटवली. जाळी हटवल्यामुळे परिसरातील नागरिकांनी ” पुणे बुलेटीन न्यूज ” व संबंधित प्रशासनाचे आभार मानले.























