Homeक्राईमफुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई : नर्तकीवर खर्च करण्यासाठी चोरी करणारा आरोपी अटकेत

फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई : नर्तकीवर खर्च करण्यासाठी चोरी करणारा आरोपी अटकेत

फुरसुंगी पोलिसांची धडक कारवाई : नर्तकीवर खर्च करण्यासाठी चोरी करणारा आरोपी अटकेत

६ लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने जप्त

✍️नितीन करडे

पुणे (ता. हवेली) – नर्तकीसोबत बैठकीचा आणि नाचगाण्याचा शौक भागवण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीकडून तब्बल 6,14,420 किमतीचे 5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने फुरसुंगी पोलिसांनी अवघ्या काही तासांत जप्त केले. या कारवाईमुळे फिर्यादी तसेच परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

फिर्यादी अभिजित मधुकर पठारे (रा. होळकरवाडी, हवेली) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये 3 डिसेंबर 2025 रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तपास पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली.या दरम्यान पोलीस हवालदार सागर वणवे आणि पोलीस अंमलदार अभिजित टिळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राहुल उत्तम पठारे (वय 39, रा. होळकरवाडी) यांनी चोरीतील काही सोने महंमदवाडी येथील एका ज्वेलर्सकडे विक्रीस दिल्याचे समजले.

पोलीस पथकाने तत्काळ राहुल पठारेच्या घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या सोन्यातील काही दागिने आरोपीने महंमदवाडी येथील सोनाराकडे विक्रीस दिले होते. त्याबदल्यात मिळालेल्या 30,000 रकमेचा वापर त्याने स्वतःवर खर्च केल्याचेही तपासात समोर आले. तपास पथकाने तत्काळ सोनाराकडून विक्री झालेले दागिने तसेच आरोपीकडील उर्वरित मुद्देमाल जप्त केला. एकूण ₹6,14,420 किमतीचे ५ तोळे सोन्याचे दागिने पुरावा म्हणून हस्तगत करण्यात आले.

ही कारवाई डॉ. राजकुमार शिंदे (पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 5), अनुराधा उदमले (सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग), अमोल मोरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेश खांडे, पो. उप.नि. विष्णु देशमुख, अधिकारी महेश नलवडे, पोहवा नितीन गायकवाड, सागर वणवे, श्रीनाथ जाधव, हरीदास कदम, सतिश काळे, महेश उबाळे, पो.कॉ. अभिजित टिळेकर, बिभिषण कुंटेवाड, वैभव भोसले यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली.

फिर्यादी अभिजित पठारे तसेच परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर आणि अचूक कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. पुढील तपास पो उपनि विष्णु देशमुख हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप

पुणे–सोलापूर महामार्गावर दगड-धोंड्यांचा धोका; अपघातास निमंत्रण, नागरिकांचा संताप ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सोरतापवाडी फाटा येथे गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार...

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत?

शिंदवणे घाटात पावसाचा कहर; रस्त्यावर खडी-दगडांचा सापळा, प्रशासन झोपेत? ✍️ नितीन करडे | उरुळी कांचन प्रतिनिधी : जेजुरी–बेल्हे महामार्गावरील शिंदवणे घाट (ता. हवेली) येथे बुधवारी (ता....

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उरुळी कांचन येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथे भगवान महावीर जयंती मोठ्या उत्साहात आणि...

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार 

पुणे–सोलापूर महामार्गावर मृत्यूचा खेळ! बल्कर ट्रक चालकाचा थरार  पुणे : पुणे–सोलापूर महामार्गावर शनिवारी (ता. २८ मार्च) मध्यरात्रीच्या सुमारास एका सिमेंट वाहतूक बल्कर ट्रक चालकाने अक्षरशः मृत्यूचा...

नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर उरुळी कांचन पोलिसांच्या जाळ्यात 

नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार दोन आरोपी अखेर उरुळी कांचन पोलिसांच्या जाळ्यात  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : अग्नीशस्त्राने थरार माजवत खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अखेर उरुळी...

error: Content is protected !!