Homeताज्या बातम्यास्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

✍️नितीन करडे

उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन समोरील चौकात आज (ता. ११ फेब्रुवारी) पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. मालवाहतूक पिकअप क्र. (एम एच ४५- ए एफ- ५८७१) या वाहनाला मागून येणाऱ्या अज्ञात कंटेनरने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

 “पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील चौकात सतत अपघात, चौक ओलांडताना नागरिकांना जीव मुठीत धरून चौक ओलांडावा लागत आहे. या चौकात आत्तापर्यंत अनेक मोठे अपघात”

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील घोटी येथील शेतकरी कुटुंबातील सदस्य फुले विक्रीसाठी पिकअप टेम्पोने पुण्यातील गुलटेकडी मार्केट येथे गेले होते. विक्री करून माघारी घरी परतत असताना पिकअपमध्ये चालकासह चार जण प्रवास करत होते. त्यावेळी दोन जण वाहनाच्या मागील बाजूस बसले होते. उरुळी कांचन येथे पोलीस स्टेशन समोरील चौकाजवळ पिकअप वाहन आल्यावर चालकाला रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाने अचानक ब्रेक मारला. याचवेळी मागून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेमुळे वाहनातील मागे बसलेले किसन बजरंग खंडाळे (वय ४६, रा. घोटी, ता. करमाळा) हे रस्त्यावर फेकले गेले. त्यानंतर मागून आलेल्या कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात लता किसन खंडाळे (वय ४२), सुरज किसन खंडाळे (वय २४) व पिकअप चालक लक्ष्मण ननवरे (वय २६, सर्व रा. घोटी, ता. करमाळा) हे तिघे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कामठे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कस्तुरी ॲम्बुलन्सचे चालक संतोष झोंबाडे, माऊली लाड, रतन चव्हाण व कदम ॲम्बुलन्सचे चालक वैभव कदम यांनी जखमींना तातडीने उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार

पुणे–सोलापूर महामार्गावर अपघात; हायवा ट्रकच्या समोरील टायरला बुलेटची जोरदार धडक; युवक जखमी, चालक पसार सलग दोन दिवसांत दोन अपघात; महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये चिंता! उरुळी कांचन...

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी कांचन पोलिसांत...

पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी येथे भरधाव कारच्या धडकेत मजूर गंभीर जखमी ; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी...

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २०...

ओतूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्यीय टोळी जेरबंद, २० गुन्हे उघड; पुणे ग्रामीण पोलिसांचे सर्वत्र कौतुक! ✍️ नितीन करडे पुणे :...

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच चोरी ; ट्रक,...

पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी चोरांचा धुमाकूळ; उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या जवळच चोरी ; ट्रक, हायवाच्या बॅटऱ्या होत आहेत लक्ष्य ✍️ नितीन करडे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांच्या बॅटरी...

उरुळी कांचनमध्ये बुलेटस्वारांचा धुडगूस; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास

उरुळी कांचनमध्ये बुलेटस्वारांचा धुडगूस; पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना कर्णकर्कश आवाजाचा त्रास पुणे–सोलापूर महामार्गावर सायलेन्सर बदललेल्या बुलेटची दहशत; विना नंबरच्या वाहनांवर कारवाईची मागणी; वारकरी कर्कश आवाजाला ञस्त ✍️...

error: Content is protected !!