नितीन करडे
पुणे प्रतिनिधी : श्री क्षेत्र थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडून आज महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी आपल्या प्रचाराला सुरवात केली आहे. यावेळी ज्ञानेश्वर कटके यांनी जनसेवेची नवी दिशा ठरवण्याचा वसा घेतला असुन विश्वास, एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणाच्या भावनेने गजाननाच्या चरणी नतमस्तक होत, जनकल्याणासाठी एक नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी पर्यावरण प्रेमी आणि लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीने वातावरणात उत्साह निर्माण झालेला पाहिला मिळाला. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कंद, आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, मुंबई महापौर केसरी पै. दत्तात्रय (आबासाहेब) काळे यांच्या शुभहस्ते प्रचाराचा शुभारंभ करुन जनतेच्या आशा आणि अपेक्षांना नवा प्रकाश देण्यात आला. याच मार्गावर चालत, प्रत्येकाच्या विश्वासाला खऱ्या अर्थाने उतरू चिंतामणी चरणी प्रार्थना केला.
