✍️पञकार- नितीन करडे.
पुणे : शेतकऱ्यांचे कृषी पंप व इलेक्ट्रिक डीपी मधील कॉपरच्या तारांची चोरी करणारी टोळी लोणीकंद पोलीसांनी जेरबंद केली. ता. १० जानेवारी रोजी न्हावी सांडस गावातील शेतकऱ्यांच्या नदी पात्रालगत बसविलेले कृषी पंपाची तोडफोड करुन त्यामधील तांब्याच्या तारा चोरीस गेल्याची शेतकऱ्यांनी अज्ञाता विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपास अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व तपास पथक अंमलदार यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या, तक्रार गुन्ह्याच्या तपासात (ता.१२ जानेवारी) रोजी स पो नि गोडसे, पो हवा कैलास साळंके, पो हवा. अजित फरांदे, हवा सागर जगताप पो शी मल्हारी सपुरे पो शी शुभम चिणके, पो शी श्रीधर शिवले, यांनी गोपनीय बातमीदार मार्फत केडगाव ता. दौंड, जि पुणे येथे सापळा लावुन रेकॉर्डवरील आरोपी महेश लक्ष्मण धुमाळ, वय २९ वर्ष, रा. आंबेगाव, वेताळनगर, केडगाव , ता. दौंड, जि. पुणे, मुळ पत्ता मुढाळे. ता. बारामती जि. पुणे यास ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता त्याने कृषी पंप चोरी केले असल्याची सांगितले. तसेच नमुद गुन्हा हा त्याचे
चोरीतील साथीदारांची नावे
१) सोमनाथ लक्ष्मण जाधव, वय २७ वर्ष,
२) तुषार संदिप काळे वय २८ वर्ष,
३) प्रथमेश बाळासाहेब जाधव वय १८ वर्ष
४) शशिकांत शंकर कदम, वय २५ वर्ष,
सर्व रा. आंबेगाव वेताळनगर केडगाव, ता. दौंड. जिल्हा पुणे, याच्या मदतीने केला असल्याचे सांगितल्याने आरोपींना गुन्ह्यात अटक करून ४ दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. ता. १५ जानेवारी रोजी पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील संपूर्ण मद्देमाल तांब्याच्या तारा (कॉपर) किंमत २७,५००/- चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला तसेच सदर चोरीचा माल घेणारा भंगार विक्रेता नासिर अहमद खान, वय ३५ वर्षे रा. न्हावी सांडस फाटा, ता हवेली जि पुणे यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे तसेच आरोपीकडे केलेल्या तपासात आरोपीनी पिंपरी सांडस, न्हावी सांडस, संगवी सांडस, डोगरगाव, बुर्केगाव, अष्टापूर, तसेच कोलवडी परीसरातील डीपी चोरी केल्याचे तपासात निष्ष्न झाले त्यांचे कडून एकूण ४०५ किलो तांब्याच्या तारा किमंत ४,२५,०००/-रुपये असे एकूण ७ गुन्हे उघडकीस आले. पुढील गुन्हयाचा तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत. ही कौतुकस्पद कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, हिमत जाधव पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ पुणे शहर, प्रांजली सोनवणे सहा पोलीस आयुत्त येरवडा विभाग पुणे शहर, यांच्या मार्दर्शनाखाली सर्जेराव कुंभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, पोलीस अंमलदार सागर जगताप, अजित फरांदे, कैलास साळुंके, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, चिंतामणी गवळी, किसन मांदळे यांनी केला आहे.























