Homeमहत्त्वाचेवळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना...

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

वळती येथे ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; शेतात मशागत करताना काळाचा घाला; परिसरात हळहळ

उरुळी कांचन प्रतिनिधी : वळती (ता. हवेली) येथे शेतात मशागत करत असताना ट्रॅक्टर तालीवरून पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. सोपान केरू कुंजीर (वय ५६, रा. वरचा मळा, वळती, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोपान कुंजीर हे स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने शेतात मशागत करत होते. यावेळी ट्रॅक्टर तालीवरून अचानक पलटी झाला. या दुर्घटनेत ते ट्रॅक्टरखाली अडकले. घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुतणे आदेश कुंजीर, जितेंद्र दत्तात्रय कुंजीर, मोहन घोलप तसेच इतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ट्रॅक्टरखालून सोपान कुंजीर यांना बाहेर काढले.

या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. नातेवाईकांनी त्यांना चारचाकी वाहनातून उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल, उरुळी कांचन येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या दुर्दैवी घटनेमुळे वळती परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुंजीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये पुढील कार्यवाही सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त

सासवड पोलिसांची मोठी कारवाई; 12 लाख 94 हजाराचा गुटखा जप्त ✍️ नितीन करडे पुणे : सासवड पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पान...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५...

मोक्का गुन्ह्यातील आरोपीकडून दोन गावठी पिस्टलसह १० जिवंत काडतुसे जप्त; यवत पोलिसांची कारवाई; ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पुणे | प्रतिनिधी- ✍️ नितीन करडे यवत पोलीस...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात...

कोरेगाव मुळमध्ये बुलेटचे ‘फटाके’ पुन्हा सुरूच ; ग्रामस्थांनी पाठलाग करून तिघांना पकडले, पोलिसांच्या ताब्यात दिले; कारवाईनंतरही रात्री सव्वा अकराला पुन्हा ‘बार’   उरुळी कांचन प्रतिनिधी :...

उरुळी कांचनमध्ये महामार्गावर भीषण अपघात! रिक्षातून उतरताना प्रवासी थेट 407 टेम्पोच्या चाकाखाली; जागीच मृत्यू...

उरुळी कांचनमध्ये महामार्गावर भीषण अपघात! रिक्षातून उतरताना प्रवासी थेट टेम्पोच्या चाकाखाली; जागीच मृत्यू ; मृताची ओळख पटवण्याचे आवाहन  प्रवासी वाहतुकीच्या नियमांना हरताळ? रिक्षा भर महामार्गात...

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक

उरुळी कांचनमध्ये गावठी पिस्टलसह शस्त्रसाठा जप्त; रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एटीएसकडून अटक ✍️ नितीन करडे   उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील...

error: Content is protected !!