Homeक्राईमलोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार इसमांसह ४ जणांकडून तब्बल ५...

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार इसमांसह ४ जणांकडून तब्बल ५ धारदार कोयते जप्त

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : तडीपार इसमांसह ४ जणांकडून तब्बल ५ धारदार कोयते जप्त

✍️नितीन करडे

लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या विशेष मोहीमेअंतर्गत लोणी काळभोर पोलिसांनी दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी अवघ्या काही तासांत दोन वेगवेगळ्या कारवायांत ४ आरोपींना ताब्यात घेऊन पाच लोखंडी धारदार कोयते जप्त केले. भविष्यातील गंभीर गुन्हे रोखण्यात या कारवाईने मोठी मदत झाल्याचे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा घातपात टळल्याचे वरिष्ठांनी नमूद केले.

दुपारी सुमारे १ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या आदेशान्वये तपास पथक अधिकारी कृष्णा बाबर यांचे पथक गस्त घालत असताना, घोरपडेवस्ती परिसरात तीन युवक कोयते घेऊन ट्रिपलसीट दुचाकीवरून अंबिका माता मंदिराच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ त्या भागात धाव घेऊन संशयितांचा पाठलाग केला. पोलिसांना पाहताच युवकांनी भरधाव वेगाने गल्ल्यांमधून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकाने कौशल्यपूर्ण पद्धतीने चहुबाजूंनी घेराव घालून अंबिका माता मंदिर परिसरात त्यांना पकडले. 1)प्रकाश काळू कांबळे वय २०, जांभुळवाडी, कात्रज) 2) मयुरेश्वर दत्तात्रय इटकर १८, टेकवडी, पुरंदर, 3) अक्षण रविंद्र चव्हाण १८, जांभुळवाडी, कात्रज अशी नावे असून त्यांच्या जवळून ४ धारदार लोखंडी कोयते, एक दुचाकी व मोबाईल फोन असा एकूण १,४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोठ्या घातपाताचा कट असल्याची शक्यता लक्षात घेता न्यायालयाकडून त्यांना पोलीस कोठडी रिमांड मिळवण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे नियंत्रण पेट्रोलिंगदरम्यान दुपारी ३ च्या सुमारास लोणी काळभोर स्मशानभूमीत तडीपार इसम रोहित महादेव पाटील ( लोणी काळभोर) हा संशयास्पद अवस्थेत आढळला. झडतीत त्याच्याकडेही एक लोखंडी कोयता आढळून आला. त्याच्याविरुद्धही हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 लोणी काळभोर पोलिसांची अतिशय उत्कृष्ट पोलिसिंग

ही कारवाई परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे व हडपसर विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोनि (गुन्हे) स्मिता पाटील, एपीआय कृष्णा बाबर, पीएसआय पूजा माळी, अनिल जाधव तसेच पोलीस कर्मचारी चक्रधर शिरगीरे, योगेश पाटील, राहुल कर्डीले, प्रविण दडस, गणेश सातपुते, रामहरी वणवे, आण्णा माने, संभाजी देवीकर, शैलेश कुदळे, बाजिराव विर, चेतन कुंभार, प्रदीप गाडे, सचिन सोनवणे, अशोक गिरी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले!

उरुळी कांचनमध्ये कल्याण मटका जुगाराचा पर्दाफाश; सराईत आरोपीला पोलिसांनी पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका...

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद!

यवत पोलिसांची दमदार कामगिरी; कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरी करणारा सराईत आरोपी जेरबंद ✍️ नितीन करडे दौंड : नाथाचीवाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषीपंपाच्या तांब्याच्या केबल चोरीचा...

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक !

गणपती वर्गणीच्या नावाखाली दुकानदाराला शिवीगाळ? व अपमानास्पद वागणूक  उरुळी कांचनमध्ये वर्गणीवरून वाद; “आमच्या गावात पोट भरायला आला आहेस, एवढेच पैसे द्यावे लागतील” असा आरोप उरुळी कांचन...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा...

उरुळी कांचनमध्ये माजी सरपंच मयूर कांचन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘The जत्रा Pattern’चा रंगणार उद्या अनोखा सांस्कृतिक सोहळा ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचनचे...

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक!

आजी-माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची बैठक ✍️ नितीन करडे पुणे : आजी-माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देणे आणि त्यांच्या विविध अडचणी जाणून...

error: Content is protected !!