मोठी बातमी : गुंड रिजवान (टिपू) पठाण च्या अनधिकृत बांधकामावर पोलिस व महापालिकेची धडक कारवाई
✍️ नितीन करडे
पुणे : कुख्यात गुंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील मोकातील सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण याचे ख्वाजा मंजिल सय्यद नगर हडपसर पुणे येथील ऑफिस असलेले अनधिकृत बांधकाम वर आज काळेपडळ पोलिस व महानगरपालिका संयुक्त पथकाने मोठी कारवाई केली.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई राबवली. अवैध बांधकाम पाडण्यासाठी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कारवाईदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जेसीबीसह यंत्रसामग्री वापरून बांधकाम पाडण्यात आले. परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई डॉ. राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडल ५ पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संयुक्त कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांकडून मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. स्थानिक प्रशासनाने सांगितले की, भविष्यात अशा अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर पावले उचलणार आहे.
























