नितीन करडे
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलीस स्टेशन हद्दीत शुक्रवार (ता. २० जून ) रोजी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान मांस घेऊन जाणारे पाच मोठे (४० टी एसी) कंटेनर गोरक्षक यांनी पकडून उरुळी कांचन पोलीसांच्या ताब्यात दिले आहेत. या कंटेनर मधे गोमांस असल्याची शंका गोरक्षक यांनी व्यक्त केला असुन मांसची तपासणी करुन जर गोमांस अढळल्यास कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी गोरक्षक अक्षय कांचन यांनी केली आहे.
आम्ही तेलंगा स्टेट मधुन कंटेनर भरला आहे. हे मांस चे बॉक्स एक्सपोर्ट साठी चालले असल्याचे चालक कंटेनर (क्रं एम एच -०६ बी डी -०४०२) च्या चालकाने सांगितले.
” एका कंटेनेर मधे अंदाजे २७ ते २८ टन मांस असण्याची शक्यता, तर पाच कंटेनर मध्ये अंदाजे १३५ टन मांस ”
अंदाजे सरासरी एक बॉक्स २० किलोचा असतो तर एका कंटेनर मधे अंदाजे १४०० ते १४५० बॉक्स आहेत. जवळपास २९ टन गाडी असते. तसेच तेलंगणा राज्यातील जहीराबाद आणि संगारेड्डी येथे हे बॉक्स कंटेनर मध्ये भरले आहेत. त्याची डिलिव्हरी जैन पेटी नवाशीवा रोड मुंबई येथे आहे. असे कंटेनर क्र. (युपी ८१ एफ टी ८००९) चालक रंनजित सिंग याने सांगितले.
पंन्नास सॅम्पल घेतले आहेत. मांस कशाचे आहे ते चेक केल्या शिवाय सांगता येणार नाही. मास कशाचे आहे ते चेक करण्यात येणार आहे. मग पुढची कारवाई करण्यात येईल. तशी आत्ता स्टेशन डायरी घेतली आहे.
– शंकर पाटील, पोलीस निरिक्षक- उरुळी कांचन पोलीस स्टेशन-
प्रत्येक गाडीतुन किमान १० सॅम्पल घेण्यात आले आहे. अशा पाच कंटेनर मधुन ५० सॅम्पल घेतले असुन ते आर डी आयल लायब्ररी, गणेश खिंड पुणे, येथे पाठवण्यात आले आहे.
– डॉ मंजुशा ढगे, पशु वैद्यकिय अधिकारी, उरुळी कांचन.
