Homeक्राईमबॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद

बॉडी बिल्डींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणारा आरोपी जेरबंद
✍️ नितीन करडे 

पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत बॉडी बिल्डींग व नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या एका आरोपीला जेरबंद करण्यात आले. आरोपीकडून सुमारे २७ हजार ४५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक २३ मे २०२६ रोजी रात्री ११ ते २४ मे २०२६ रोजी पहाटे २ वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. यावेळी युनिट ७, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, खंडणी विरोधी पथक २ चे अधिकारी व कर्मचारी काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत होते.

दरम्यान, पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी अभिषेक खंडु भडंगे (वय २५, रा. हिंगणे मळा, हडपसर) हा एका पत्र्याच्या खोलीतून विनापरवाना “MAPHENTERMINE SULPHATE INJECTION IP TERMIVA” या प्रतिबंधित इंजेक्शनची विक्री करत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर तत्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला असता पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याच्याकडून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या “TERMIVA” या इंजेक्शनच्या एकूण ८२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त मुद्देमालाची किंमत २७ हजार ४५३ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७५, २७८ व १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी हडपसर पोलीस स्टेशन येथे ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले व किरण पडयाळ यांनी ही कारवाई पार पाडली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना

रामवाडी-वाघोली मेट्रो मार्गाबाबत आढावा बैठक; नागरिकांच्या सुविधांना प्राधान्य देण्याच्या आमदार कटके यांच्या सूचना ✍️ नितीन करडे पुणे : प्रस्तावित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गासंदर्भात मेट्रो प्रशासनाच्या...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ७०० वृक्षांचे रोपण; विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युथ...

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात

उरुळी कांचनमध्ये दारूबंदी केवळ कागदावर? बेकायदा दारू विक्री जोमात नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड व हडपसर परिसरात विषारी हातभट्टी दारूमुळे...

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी

पुणे–सोलापूर महामार्गावर दुचाकी व खासगी बसचा भीषण अपघात; एक गंभीर तर एक किरकोळ जखमी ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाटा येथे गुरुवार...

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल

नायगाव फाटा परिसरातून १६ वर्षीय मुलाचे अपहरण; उरुळी कांचन पोलिसांत गुन्हा दाखल उरुळी कांचन प्रतिनिधी : नायगाव फाटा (ता. हवेली) परिसरातील श्रेयस रोज नर्सरी येथून...

error: Content is protected !!