पुणे : आमदार अशोक पवार व आमचे कौटुंबीक संबध असुन मी सदैव अशोक पवार यांच्या बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्या विजयासाठी मी शहरातील प्रचारफेरीत सहभाग घेतला असून अशोक पवार हे विजयी होउन हॅट्रीक करतील असा ठाम विश्वास प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांनी व्यक्त केले. शिरुर हवेली विधानसभा मरदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शिरुर शहरात व उपनगरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रकाश धारीवाल प्रचार फेरीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह भरला होता. गेल्या पंधरा वर्षाहुन अधिक काळ शिरुर नगरपरिषदेवर प्रकाश धारीवाल यांची सत्ता आहे. त्या मुळे २००९ पासुन प्रकाश धारीवाल यांनी अशोक पवार यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत साथ दिली त्यामुळे शिरुर शहरात प्रकाश धारीवाल यांच्या फेरीमुळे नवचैतन्य पसरले आहे. यावेळी आमदार अशोक पवार ,युवा उद्योजक आदित्य धारीवाल ,सुजाता पवार, विश्वास ढमढेरे ,मुजफ्फर कुरेशी ,पोपटराव शेलार ,संजय देशमुख ,वैभव यादव ,माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे ,विठ्ठल पवार ,राणी कर्डिले ,स्मिता कवाद ,गिता आढाव ,सविता बोरुडे ,प्रियंका धोत्रे सर्व माजी नगरसेवक व नगराध्यक्षा ,मंगेश खांडरे अमित शिर्के राजुद्दीन सय्यद , अमोल चव्हाण राहील शेख ,हाफीज बागवान ,रविंद्र खांडरे ,कलीम सय्यद ,योगेश पवार आदी सह नागरीक उपस्थित होते .
” प्रकाश धारीवाल ”
आमचे सर्व पक्षाशी चांगले संबध आहे मात्र अशोक पवार यांचे आमचे तीन पिढ्याचे संबध आहे आम्ही नगरपालीकेत असताना भरपुर विकास निधी त्यांनी आम्हाला दिला त्या मुळे शहराचा चेहरा मोहरा बदलताना अनेक विकास कामे झाली बरेच नगरसेवक हे अशोक पवार यांच्या बरोबर असुन कारण अशोक पवार यांनी भरपुर निधी दिला आहे मि वैयक्तीक त्यांच्या बरोबर आहे अशोक पवार हे स्पष्ट वक्ते असुन ते विजयी होउन हॅट्रीक करतील व महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मंत्री होतील असा विश्वास धारीवाल यांनी व्यक्त केला .
