Homeक्राईमपुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन...

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात!

पुणे शहरात अवैध दारू विक्रीवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दुहेरी छापा; दोन आरोपी ताब्यात!
केसनंद आणि कोंढव्यात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीचा पर्दाफाश; अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ची धडक कारवाई
✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ ने धडक कारवाई केली आहे. केसनंद (ता. हवेली) आणि कोंढवा परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही आरोपींविरोधात संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केसनंदमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होती दारू विक्री

दि. २३ नोव्हेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण व त्यांच्या पथकाचे कर्मचारी वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत थेऊर ते केसनंद रस्त्यावरील आण्णा गार्डन ढाब्याजवळील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना देशी व विदेशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खात्री करून छापा टाकला असता, दयाशंकर रामविलास तिवारी (वय ४७, रा. केसनंद) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे दारू विक्री करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोंढव्यात भेळ सेंटरच्या ठिकाणी देशी दारू विक्री

दुसऱ्या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व त्यांचे पथक कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना भैरवनाथ मंदिराशेजारील जय भोलेनाथ भेळ सेंटर येथे टँगो पंच देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. यावेळी कोंढवा पोलिसांचे पथकही परिसरात पेट्रोलिंग करीत होते. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही पथकांनी संयुक्त कारवाई केली. छाप्यादरम्यान अभिषेक सुरेश कुंभार (वय २१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) हा विनापरवाना टँगो पंच देशी दारूच्या बाटल्यांची विक्री करताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, गौहर हसन, सहा पोलीस आयुक्त गुन्हे – ३ शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा, पुणे शहर जीवन माने यांचे सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार सतिश चव्हाण, संदिप देवकाते, शरद धांडे, योगेश कुंभार, अख्तर शेख, योगेश माढरे, सुरेखा साबळे, जान्हवी सुर्यवंशी, सुकेशिनी आंबले व अजिंक्य जोजारे अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर व कोढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गावडे, पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले वअमोल हिरवे यांनी केली आहे…

पुणे शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या दुहेरी कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात...

सासवडमधील २०१९ च्या खून प्रकरणाचा अखेर निकाल; पाच आरोपींना जन्मठेप, सासवड पोलिसांच्या तपासाला न्यायालयात यश; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ✍️ नितीन करडे सासवड :...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद,...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण! उरुळी कांचन...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

error: Content is protected !!