✍️नितीन करडे
संबंधित अधिकारी यांनी बातमीची त्वरित घेतली दखल
उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावरील पडललेल्या खड्याची बातमी पुणे बुलेटिन न्यूज च्या माध्यमातून रविवार (ता. २२ रोजी) प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेत एका तासाच्या आत संबंधित प्रशासनाने पुणे सोलापूर महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम चालू केले. वैष्णव भक्तांचा पुणे सोलापूर महामार्गावरुन उरुळी कांचन येथुन जाताना प्रवास होणार सुखरूप.
” या बातमीचा इफेक्ट “
सद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा काही तासात येणार असुन उरुळी कांचन येथील पुणे सोलापूर महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे वैष्णव भक्तांचा प्रवास खडतर होणार अशी बातमी पुणे बुलेटिन न्यूज ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत संबंधित अधिकाऱ्याने त्वरित स्वतः उभे राहून खड्डे बुजवण्याचे काम चालू केले आहे. बातमीची दखल त्वरित घेतल्याने स्थानिक नागरिकांनी पुणे बुलेटिन न्युज चे आभार मानले.
