Homeक्राईमपुणे ग्रामीण मुख्यालयाची उरुळी कांचनमध्ये धडक कारवाई! मटका व अवैध दारू अड्ड्यांवर...

पुणे ग्रामीण मुख्यालयाची उरुळी कांचनमध्ये धडक कारवाई! मटका व अवैध दारू अड्ड्यांवर छापा; ११ जण ताब्यात, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुणे ग्रामीण मुख्यालयाची उरुळी कांचनमध्ये धडक कारवाई! मटका व अवैध दारू अड्ड्यांवर छापा; ११ जण ताब्यात, स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुख्यालयाच्या पथकाने केली कारवाई; अवैध धंद्यांना नेमका कोणाचा वरदहस्त? नागरिकांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन परिसरात अवैध धंदे पुन्हा एकदा बोकाळल्याचे समोर आले असून, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या विशेष पथकाने शुक्रवारी (दि. ३१ जुलै) सायंकाळी बाजार मैदान परिसरात मटका आणि अवैध देशी दारू विक्रीवर धडक छापा टाकत ११ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूच्या बाटल्या, मटका साहित्य व इतर सामग्री असा सुमारे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचनमध्ये अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयाला मिळाली होती. त्यानंतर विशेष नियोजन करून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाजार मैदान परिसरात अचानक छापा टाकण्यात आला. या कारवाईत मटका आणि अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून ११ जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी (मुख्यालय) भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी गौरव गुंजेंगावकर, बाळासाहेब कारंडे, अक्षय देवकाते, रिनेश माहुरे आणि यश देसाई यांच्या पथकाने केली.

या कारवाईनंतर मात्र स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण मुख्यालयाचे पथक उरुळी कांचनमध्ये यावे लागत असेल, तर स्थानिक पोलीस नेमके काय करत होते, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. गावात उघडपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती स्थानिक यंत्रणेला नव्हती का?, की त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले?, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

“उरुळी कांचन परिसरातील अवैध धंद्यांना पाठबळ कोणाचे? चौकशी होणार का?”

गेले काही महिन्यांपूर्वी उरुळी कांचन परिसरातून पुरवठा झालेल्या हातभट्टी दारूच्या प्रकरणात पुणे शहरातील निष्पाप २२ जणांचा मृत्यू झाल्याची बाब तपासात समोर आली होती. त्यावेळी पुणे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी कडक भुमिका बजावत दौंड व उरुळी कांचन येथील चार पोलीस निलंबित केले होते. तसेच दौंड, उरुळी कांचन येथील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करत आळा घातला होता. मात्र कालांतराने पुन्हा अवैध धंद्यांनी डोके वर काढल्याचे या ताज्या कारवाईतून स्पष्ट होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

या कारवाईनंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे आला आहे. ही धडक मोहीम फक्त एकदिवसीय ठरणार का, की अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई केली जाणार? छापा संपल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार नाही ना, अशीही शंका नागरिक व्यक्त करत आहेत. उरुळी कांचन परिसरातील मटका, तसेच लपून छपून विक्री होत असलेली अवैध दारू, गुटखा तसेच राज्य महामार्गावरुन होणारी अवजड वाहतूक आणि इतर बेकायदेशीर धंद्यांना नेमके पाठबळ कोणाचे मिळत आहे, याची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे उरुळी कांचनमधील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी मोहीम राबवावी, तसेच संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

……….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!