नवीन चेहरा जिल्हा परिषद निवडणूकीसाठी योगेश सातपुते यांच्या उमेदवारीची चर्चा जोमात
उरुळी कांचन प्रतिनिधी : स्थानिक समाजकार्य आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले योगेश नारायण सातपुते हे नाव सध्या जिल्हा परिषद समिती सदस्य निवडणूकी साठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे.
योगेश सातपुते हे ओम साई फॅब्रिकेशन या व्यवसायाचे मालक असून, सातपुते यांनी प्रत्यक्ष कामातून आणि समाजाशी निगडीत उपक्रमांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. सोरतापवाडी, तरडे, वळती, शिंदवणे आणि उरुळी कांचन या परिसरात त्यांनी सातत्याने सहभाग घेत कामे केली असून, सर्व समाजघटकांशी मिळूनमिसळून, प्रामाणिकपणे आणि मैत्रीपूर्ण नातेसंबंध जोपासल्याची नागरिकांमधे चर्चा होत आहे. योगेश सातपुते हे चर्मकार समाज उरुळी कांचन चे उपाध्यक्ष तसेच योगिराज मित्र मंडळ, तळवाडी चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
दरम्यान, योगेश सातपुते यांचे नाव उरुळी कांचन सोरतापवाडी गणात पुढे येताच तरुण कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच तिकीट वाटपानंतरचे चित्र अधिक स्पष्ट होणार असल्याने आगामी काही दिवसांत राजकीय समीकरणे उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेदावारीसाठी नवीन चेहरे उतरले असल्याने एकूणच उरुळी कांचन सोरतापवाडी गणात निवडणुकीची हवा चांगलीच तापू लागली आहे!
स्थानिकांमध्ये त्यांच्या कार्यतत्परतेबद्दल आणि लोकांशी जुळवून घेण्याच्या वृत्तीबद्दल सकारात्मक वातावरण असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत योगेश सातपुते हे एक प्रभावी पर्याय ठरू शकतात, अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे.























