Homeक्राईमटेम्पोने सहा जणांना चिरडले उरुळी कांचन येथील घटना; २ जणांचा जागीच मृत्यू...

टेम्पोने सहा जणांना चिरडले उरुळी कांचन येथील घटना; २ जणांचा जागीच मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

✍️नितीन करडे

टेम्पोने सहा जणांना चिरडले उरुळी कांचन येथील घटना; २ जणांचा जागीच मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील तळवाडी चौकात टेम्पोने गावी जाणाऱ्या सहा जणांना उडवुन चिरडले. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असुन चार जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आहे.

उरुळी कांचन येथे (ता. ०२ जून) बुधवार रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तळवडी चौकात काही लोक हे आपल्या गावी जाण्यासाठी थांबले असताना एक अशोक लेलँड कंपनीचा छोटा हत्ती गाडी क्र. एम एच- ४५- १८७९ (पूर्ण नंबर समजून शकला नाही) या टेम्पोने थांबलेले लोकांना भरधाव वेगाने येऊन धडक देऊन चिरडून पुणे सोलापूर महामार्गावरुन सोलापूर च्या दिशेने पसार झाला. या अपघातात एकुण सहा जणांना उडवले.

 मृत्यू झालेल्यांची नावे- 

1) अशोक भीमराव (वय २५ वर्ष, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक). 2) मेहबूब रहमान मियाडे (वय ६७ वर्ष) रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड जिल्हा पुणे. या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

 जखमींची नावे –

1) भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड उरुळी कांचन -ता. हवेली, पुणे.

2) मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय ६७ वर्षे रा. आंबा पिंपळगाव, लातूर,

3) वैशाली भागवत बनसोडे (वय ४० वर्ष रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे),

४) भागवत बनसोडे वय- ४५ वर्ष, हे चार जण गंभीर जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अक्षय (बंटी) कांचन यांचा मित्रपरिवार व धनंजय लोहार सह ग्रामस्थांनी मदत करून रुग्णवाहिका बोलून अपघातग्रस्तांना पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालय सिद्धिविनायक हॉस्पिटल व विठ्ठल हॉस्पिटल येथे उपचार दाखल केले. या अपघात करुन पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध उरुळी कांचन पोलीस घेत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री थेट: स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्सवर सर्वोत्कृष्ट ऑफर

Amazon मेझॉन प्राइम डे 2025 विक्री आता भारतात थेट आहे. तीन दिवसांचा भव्य विक्री कार्यक्रम 14 जुलै 2025 पर्यंत खुला राहील. यावर्षीच्या प्राइम डे...

बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस 15 दिवसांपर्यंत बॅटरीच्या आयुष्यासह भारतात लाँच केले गेले: किंमत,...

शुक्रवारी भारतात बोट व्हॅलर वॉच 1 जीपीएस सुरू करण्यात आले. स्मार्टवॉच हे बोटच्या नवीन शौर्य लाइनअपमधील पहिले उत्पादन आहे. त्याच्या नावाप्रमाणेच, ते इनबिल्ट जीपीएस...

मिथुन मधील Google चे veo 3 व्हिडिओ निर्मितीच्या क्षमतेवर प्रतिमेसह श्रेणीसुधारित केले

Google आता प्रतिमा-ते-व्हिडिओ जनरेशनच्या समावेशासह आपल्या VEO 3 व्हिडिओ निर्मिती मॉडेलची कार्यक्षमता सुधारत आहे. गुरुवारी, माउंटन व्ह्यू-आधारित टेक जायंटने घोषित केले की पात्र वापरकर्ते...

error: Content is protected !!