पुणे प्रतिनिधी : टिळेकर वाडी (ता. हवेली) येथील उपसरपंच पदाची जाग रिक्त झाल्याने (ता. १४ नोव्हेंबर गुरुवार) रोजी सकाळी ११: ५५ वाजता उपसरपंच पदाची निवडून सरपंच गणेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी टिळेकर वाडीच्या उपसरपंच पदासाठी वैशाली भानुदास चौरे यांचा एकच अर्ज आल्याने टिळेकर वाडीच्या उपसपंच पदी वैशाली चौरे यांची बिनविरोध निवडून करण्यात आली. ही निवडून टिळेकर वाडीचे सरपंच गणेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी महात्मा गांधी सर्वोदय संघाचे संचालक राजेंद्र टिळेकर, श्रीदत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष टिळेकर, सरपंच गणेश टिळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश टिळेकर, पोलीस पाटील विजयराव टिळेकर,विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन अक्षय टिळेकर, मा. सरपंच सुभाष लोणकर, ग्रा.पं सदस्य गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, सुषमा टिळेकर, कल्पना टिळेकर, नंदा राऊत, प्रियांका कांबळे, प्रगतशील शेतकरी बाळासाहेब चौरे, बाळासाहेब टिळेकर,सुभाष लक्ष्मण टिळेकर रंगनाथ चौरे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण टिळेकर, किसन टिळेकर, सुभाष लालासो टिळेकर, रतन टिळेकर, सूर्यकांत टिळेकर,भानुदास चौरे, समीर चौरे, रोहिदास टिळेकर आदी पधादिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते.
