Homeक्राईमजेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा...

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप !

जेव्हा निघते कर्कश्य बुलेटच्या आवाजाची सवारी, वाट देते दुनिया सारी म्हणणाऱ्यांना पोलिसांचा बुलडोझर भारी ; उरुळी कांचन पोलिसांचा कर्कश्य बुलेट स्वरांवर चाप !

✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मॉडिफाईड बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे कर्णकर्कश आवाज काढत धिंगाणा घालणाऱ्या वाहनचालकांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. नागरिकांच्या सातत्यपूर्ण तक्रारींची दखल घेत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत १३ मॉडिफाईड बुलेटवर कारवाई करून १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर यापूर्वी जप्त करण्यात आलेले २९ मॉडिफाईड सायलेन्सर रस्त्यावर ठेवून रोलर फिरवून नष्ट करण्यात आले.

” मॉडिफाईड बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाला उरुळी कांचन पोलिसांचा लगाम; २९ सायलेन्सर रोलरखाली चिरडले; १३ बुलेटवर आरटीओची कारवाई; १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल “

पुणे-सोलापूर महामार्गासह उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, शिंदवणे, सोरतापवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मॉडिफाईड सायलेन्सर बसविलेल्या बुलेटमधून मोठमोठे आवाज काढण्याचे प्रकार वाढले होते. काही वाहनचालक सायलेन्सरमधून फटाक्यांसारखे आवाज काढत सुसाट वेगाने वाहने चालवत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या. याशिवाय, कर्कश हॉर्नचा वापर करणे, नंबर प्लेट नसताना वाहने चालविणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकारही निदर्शनास येत होते. या प्रकारामुळे परिसरातील वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले तसेच सामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. नागरिकांनी याबाबत उरुळी कांचन पोलिसांकडे सातत्याने तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी वाहतूक विभागाला विशेष कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रित करून कारवाई केली.

या मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ बुलेट मोटारसायकलींवर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO), पुणे यांच्यामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनचालकांकडून एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कारवाईदरम्यान यापूर्वी जप्त करण्यात आलेले २९ मॉडिफाईड सायलेन्सर पोलिसांनी रस्त्यावर ठेवून त्यावर रोडरोलर फिरवला. या कारवाईत हे सायलेन्सर पूर्णपणे चेपून नष्ट करण्यात आले. मॉडिफाईड सायलेन्सरविरोधात पोलिसांनी घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे. केवळ मॉडिफाईड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवरच कारवाई न करता, वाहनांमध्ये बेकायदेशीर फेरफार करणाऱ्या गॅरेजचालकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. वाहनांच्या मूळ रचनेत नियमबाह्य बदल करून कर्णकर्कश आवाज निर्माण करणारे सायलेन्सर बसविणाऱ्यांवरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

ही धडक कारवाई उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे सहायक फौजदार रमेश भोसले, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, अमोल खांडेकर, अश्वजीत मोहोड, धनंजय भोसले, वार्डन हिरामण करे, तसेच होमगार्ड राजू मेंगजी, नागेश चव्हाण, नवनाथ चव्हाण आणि नवनाथ वेताळ यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, सार्वजनिक रस्त्यांवर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेन्सरचा वापर, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर फेरफार करणाऱ्या वाहनांवर यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे दिक्षांत समारंभ उत्साहात संपन्न ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक येथे शासकीय स्तरावर घेण्यात आलेल्या...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल,...

सासवड पोलिसांची मॉडिफाइड सायलेन्सरच्या ४७ बुलेटवर कारवाई; तब्बल ४ लाख ७० हजार दंड वसूल, तसेच वाहतूक नियम भंग करणाऱ्या ३२६ जणांवर कारवाई मॉडिफाइड बुलेट सायलेन्सर...

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई!

मोक्का व खंडणीसारख्या गुन्ह्यांतील आरोपीकडून गावठी पिस्टलसह जिवंत काडतूस जप्त; यवत पोलिसांची कारवाई ✍️ नितीन करडे दौंड : यवत (ता. दौंड) पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईची...

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक!

सासवड पोलिसांची दमदार कारवाई; गावठी पिस्टलसह तरुणाला अटक ✍️ नितीन करडे सासवड : सासवड पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दमदार कारवाई करत अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या...

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सुपे घाटात शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण ✍️ नितीन करडे सुपे : सुपे घाटातील चढावर शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस...

error: Content is protected !!