जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उरुळी कांचन येथे भव्य स्वागत
उरुळी कांचन (ता. हवेली) येथे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजा यांच्या पालखी सोहळ्याचे उरुळी कांचन ग्रामपंचायत, प्रशासन अधिकारी, व ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. उरुळी कांचन येथील बस स्टॉपच्या मागे विसाव्यासाठी पोहचली असुन भक्तांच्या दर्शनासाठी पालखी रथ एक ते दिड तास थांबणार आहे. पोलीस प्रशासनाने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला.
