घरफोडी करणारे आरोपी जेरबंद; हडपसर तपास पथकाची कामगिरी, आरोपींकडून ३७ लाखाचा मुद्देमाल जप्त
✍️नितीन करडे
पुणे : (ता.१४ जून) रोजी बंद असलेले घर फोडून घरातून सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली असल्याचा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांच्या मार्गदर्शनाखाली संजय मोगले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली होती पुढील तपास करण्या करीता. हडपसर तपास पथकाचे प्रभारी अधिकारी हसन मुलाणी, पो उपनि, सत्यवान गेंड,पो अंम दिपक कांबळे, तुकाराम झुंजार, कुंडलीक केसकर, भगवान हंबर्डे, अजित मदने, अभिजीत राऊत, चंद्रकांत रेजितवाड, महावीर लोंढे, यांनी घटनास्थळ सोसायटी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी व त्यांनी चोरीत वापर केल्याली चारचाकी वाहनाबाबत फुटेज प्राप्त करुन पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्हीची तपासणी केली. तपासामधून आरोपींबाबत उपयुक्त माहीती हडपसर तपास पथकास मिळून आली. त्यात संशयीत १) गणेश अर्जुन पुरी वय ३३ वर्षे रा. सध्या ग्रीनवुड सोसायटी श्रीकृष्ण मंगल कार्यालया शेजारी झेड कॉर्नर मांजरी पुणे. ताब्यात घेण्यात आला. त्याने दाखल गुन्हा त्याचे साथीदारा सह केल्याची कबुली दिली. २) रविसिंग शामसिंग कल्याणी वय २७ वर्षे रा. कोठारी व्हिल्स रामटेकडी हडपसर पुणे. ३) निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी वय ४४ वर्षे रा. मु.पो. वांगणी ता. अंबरनाथ जि.ठाणे यांना ताब्यात घेण्यात आले.
या गुन्ह्यात आरोपींनी चार चाकी टाटा नेक्सॉन या गाडीचा वापर केला. ही गाडी ही सुमारे ८-१० महिन्यापुर्वी आरोपी याच्या भावाने विकत घेतो असे सांगून घेतली होती परंतु सदरगाडी ही नावावर केली नव्हती. तसेच आरोपी यांनी नेक्सॉन गाडीशी मिळता जुळता आरटीओ नंबर प्राप्तकरून बनावट नंबर प्लेट गाडीला लावली घरफोडी केली होती.
आरोपींकडे पुर्ण तपासात केला असता त्यांचे कडून हडपसर पोलीस ठाणे, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे, सीडको पोलीस स्टेशन संभाजी नगर शहर याठिकाणी गुन्हे केले असल्याचे कबुली दिली. तसेच आरोपींकडून किं. रू
३७,००,०००/- माल जप्त केला, त्यात २२,५०,०००/- चे सोन्या चांदीचे दागिने, १४,५०,०००/रु गुन्ह्या करीता वापर केलेली नेक्सॉन गाडी,असा माल जप्त करण्यात आला.
आरोपी १) रविसिंग शामसिंग कल्याणी वय, याचेविरूध्द घरफोडी, वाहनचोरी, दरोड्याचा प्रयत्न याबाबत २६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. २) निरंजनसिंग भारतसिंग दुधाणी याचेविरूध्द ५ गुन्हे दाखल आहेत. तसेच ३) गणेश अर्जुन पुरी याचेविरूध्द वाहनचोरीचे ९ गुन्हे दाखल आहेत. यात अटक आरोपींचा १ साथीदार फरार असून त्यास अटक करून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कामगिरी अमितेशकुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनां प्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, नामदेव मारटकर, माऊली चोरमले, माधव हिरवे, अमोल जाधव यांचे पथकाने ही कामगिरी केली.
