✍️ नितीन करडे
हवेली तालुक्यातील खामगाव टेक गावचे विद्यमान उपसरपंच मारुती किसन थोरात यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंच पदाची निवडणूक लागल्यामुळे व खामगाव टेक गावचे सरपंच पद रिक्त असल्याने उपसरपंच पदाची निवडणूक अध्याशी अधिकारी उरुळी कांचन गावच्या मंडल अधिकारी माधुरी बागले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्यांनी बाळू आबू थोरात हे उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषित केले. संपूर्ण निवड प्रक्रिया बिनविरोध झाल्याने खामगाव टेक गावामधे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित उपसरपंच बाळू थोरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गावाचा विकास हा सर्वांना एकत्र बरोबर घेऊन केला जाईल. राहिलेली संपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. ही निवड प्रक्रिया बिनविरोध करण्यासाठी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र टिळेकर, माजी सरपंच मारुती थोरात, माजी उपसरपंच प्रेमजी थोरात, दत्तात्रय थोरात उपस्थित होते. तसेच महसूल अधिकारी उषा मुंडे, टिळेकर वाडी गावचे पोलीस पाटील विजयराव टिळेकर, ग्रामविकास अधिकारी संजय लोणकर, खामगाव टेकच्या पोलीस पाटील तनुजा थोरात, सोसायटीचे व्हाईस चेअरमन आकाश कांचन, माजी उपसरपंच बबन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते बेंगळे सर ग्रा. सदस्या राणी कांबळे, सविता कांबळे, सखुबाई धायगुडे, शितल शेंडगे, आदी पदाधिकारी, ग्रामस्थ व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
