Homeक्राईमउरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!

उरुळी कांचन–सोरतापवाडीत शटरफोडींचा धुमाकूळ!
एका रात्रीत दोन ठिकाणी चोरी; सीसीटीव्हीत तीन चोर कैद, परिसरात टोळी सक्रिय असल्याची चर्चा
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन (प्रतिनिधी): पुणे–सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन व सोरतापवाडी  (ता. हवेली) परिसरात शटरफोडीच्या घटना सातत्याने वाढत असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (दि. 26 जुलै) रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात तीन चोरट्यांनी उरुळी कांचन येथील माऊली हॉस्पिटल समोरील मल्हार मेडिकलचे शटर उचकटून 25 ते 27 हजारांच्या दरम्यान रोख रक्कम लंपास केली असल्याची माहिती समोर आली असुन या घटनेतील तिन्ही चोर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाले आहेत.

याच रात्री सोरतापवाडी (ता. हवेली) येथेही एका हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वायरींचे बंडल आणि रोख रक्कम चोरी करण्यात आली. त्यामुळे एका रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शटरफोडींमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या पाच दिवसांपूर्वी उरुळी कांचन येथे पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका दूध डेरीचे शटर उचकटून रोकड व काही साहित्य चोरी करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शटरफोड करणारी एकच टोळी परिसरात सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याशिवाय, आठ दिवसांपूर्वी सोरतापवाडी येथील स्वीट होम दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश करण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केला होता. मात्र, दुकानाच्या आत कामगार झोपलेले असल्याने चोरांनी तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.

सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सीसीटीव्हीत चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत असतानाही चोरीच्या घटनांना आळा बसत नसल्याने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चोरी करताना चोर सीसीटीव्ही मध्ये कैद व्हिडिओ –

व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी, शटरफोडी करणाऱ्या टोळीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. एकाच पद्धतीने शटर उचकटून चोरी होत असल्याने या सर्व घटनांमागे एकाच सराईत टोळीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस तपासानंतरच या सर्व घटनांमागील सत्य स्पष्ट होणार असले, तरी सलग शटरफोडींनी उरुळी कांचन व सोरतापवाडी परिसरातील व्यापाऱ्यांची झोप उडवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद!

मिरवडी ग्रामपंचायतीत सायबर जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद क्विक हील फाउंडेशनच्या 'सायबर शिक्षणातून सायबर सुरक्षा' उपक्रमांतर्गत नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : वाढत्या...

error: Content is protected !!