✍️नितीन करडे
पुणे : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन -जेजुरी महामार्गावरील कांचन सोसायटी येथे जेवन झाल्यावर महिला फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या तर जाण्याच्या रस्त्यावरच मांस अडवलेले कंटेनेर साठी पोलीस तैनात होते. ९ वाजण्याच्या दरम्यान फेरफटका मारणाऱ्या महिलेच्या पाठीमागून मोटारसायकल वरुन तोंडाला रुमाल बांधलेले दोन जण आले आणि महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे दागिने हिसकावून तैनात असलेल्या पोलीसांसमोरुन पसार झाले असल्याची घटना शुक्रवार (ता.२० जून रोजी) राञी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. पोलीसांना घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी चोरांचा पाठलाग केला पण चोर मोटारसायकल वरुन सुसाट पसार झाले.
“उरुळी कांचन येथे सततच्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे येणाऱ्या वैष्णव भक्तांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर “
“सोन्याचे दागिने घालत असाल तर महिलांनो सावधान उरुळी कांचन येथे चोर तुमच्या दागिन्यावर कधीही मारु शकतो डल्ला “
उरुळी कांचन येथे महिन्यापासुन सतत होणाऱ्या चोऱ्यामधील एकही चोर अजून पोलिसांच्या जाळ्यात नाही. त्यामुळे नागरिकांमधून पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पोलीसांचे काम तरी काय ? फक्त गाड्या अडवून नागरिकांना ञास देणेच का ? असा सवाल आता नागरिकांनी केला आहे.
