✍️नितीन करडे
संत जगतगुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दर वर्षी लाखों भक्त सहभाग घेतात. त्यासाठी वैष्णव भक्तांचा प्रवास सुखरूप, सुखकर होण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना राबवते. परंतु यात संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर महामार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे काही बुजवण्यात आले तर काही जश्याच्या तसेच राहिल्याने अधिकाऱ्यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून आले आहे.
“पडलेल्या खड्ड्यांमुळे वारकऱ्यांचा प्रवास खडतर होणार !”
सोमवार (ता. २३ रोजी) दुपारचा पालखी विसावा उरुळी कांचन येथील बस स्टॉप चौक येथे नियोजन केले आहे. सोलापुर दिशेला जाण्याच्या महामार्गावर खड्डे पडले असुन काही खड्डे बुजवले असुन काही खड्डे जशाच्या तसे आहेत. पालखी काही तासावर असुन वारकऱ्यांचा प्रवास खडतर होणार आहे. यात अधिकाऱ्यांचा हलगर्जी पणा उघड झाला आहे.
याच खड्यातुन जाताना वारकऱ्यांना मार्ग काढत पुढे जावे लागणार आहे. कारण उरुळी कांचन परिसरातील पुणे सोलापूर महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर रस्त्यावर झालेले डांबराचे टेमकड (वरखाली, दबलेला रस्ता) जशीचा तसाच आहे.
खड्डे पडलेले ठिकाणे:-
बस स्टॉप चौक येथील पालखी विसाव्याच्या वळण्याच्या ठिकाणी खड्डे पडलेला पट्टा, तसेच तळवाडी चौकातील सहा सीटर संघटनेच्या समोर पडलेले खड्डे…..
तर यात काही खड्डे बुजवण्यात आले तर काही जशाच्या तसे आहे. यात महामार्गावरून जाताना खड्ड्यांमुळे वारकऱ्यांचा प्रवास खडतर होणार आहे.
