उरुळी कांचन (ता. हवेली) उरुळी कांचन येथील प्रसिद्ध शाळेच्या बाजूला असणाऱ्या जिजाऊ सभागृहाच्या परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांची फ्री स्टाईल हाणामारी करणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. ही घटना शाळेची मधली सुट्टी झाली त्यावेळी घडली आहे. या घटनेनी शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उरुळी कांचन मध्ये मारामारी हा नित्याचा विषय झालेला असून कायदा आणि सुव्यवस्था याठिकाणी हतबल झालेली पाहण्यास मिळत आहे.जिजाऊ परिसरात नित्याचीच गर्दी पाहण्यास मिळते व आजपर्यंत झालेल्या घटनांपैकी अनेक घटना याच परिसरात झालेले निदर्शनास येऊन देखील पोलिस प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहेत हा एक न समजणारा प्रश्न आहे.परिसरात तीन ते चार शाळा पाठीमागे दररोज भरणारा बाजार असे मोक्याचे ठिकाण असल्याने इथे अनेकवेळा हाणामारी झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.तसेच शाळा परिसरात अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येऊ नये अशा वस्तू विकल्या जात आहेत.
