Homeक्राईमउरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच...

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला, सीसीटीव्हीत पाच संशयित कैद, सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

उरुळी कांचन परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री दोन दुचाकी चोरीला! सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; सलग दोन रात्री चोऱ्यांच्या घटना! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, वाहनचालक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सलग दोन रात्री वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, पहिल्या दिवशी चोरट्यांनी अवजड वाहनांच्या बॅटऱ्यांना लक्ष्य केले, तर दुसऱ्याच दिवशी कांचन पार्क सोसायटी परिसरातून दोन होंडा युनिकॉर्न मोटारसायकली चोरून नेल्या. या दुचाकी चोरीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तब्बल पाच संशयित व्यक्ती दोन मोटारसायकली घेऊन जाताना दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. २१ नोव्हेंबर रोजी शनिवारी इनामदार वस्ती परिसरात उभ्या असलेल्या दोन हायवा ट्रकच्या चार बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. त्याच दिवशी शिंदवणे येथील काळे शिवार परिसरातून एका ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनांना चोवीस तास उलटत नाहीत तोच दि. २२ नोव्हेंबर रोजी रविवारी पहाटेच्या सुमारास कांचन पार्क सोसायटी परिसरात दोन मोटारसायकली चोरीला गेल्याचे उघडकीस आले. त्यामुळे उरुळी कांचन परिसरात चोरट्यांनी डोके वर काढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन पार्क सोसायटी, बिल्डिंग क्रमांक ३ येथे राहणारे भाऊसाहेब शिवाजी दळवे (वय ५०) हे प्रयागधाम आश्रम येथे नोकरी करतात. त्यांच्या वापरासाठी त्यांचे भाचे लक्ष्मण वसंत काटवटे यांच्या मालकीची काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक एमएच १२ एसडी १७२३) गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे होती. दि.२१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दळवे यांनी नेहमीप्रमाणे आपली मोटारसायकल इमारतीच्या बाहेरील मोकळ्या जागेत हँडल लॉक करून पार्क केली होती. त्यानंतर ते घरी झोपण्यासाठी गेले.

मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या मोटारसायकलीवर डल्ला मारला. दि. २२ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास शेजारील इमारतीत राहणारे राहुल ढोणे यांनी दळवे यांना फोन करून, काही अज्ञात व्यक्ती मोटारसायकल ढकलत घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर दळवे यांनी तातडीने पार्किंगच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मोटारसायकल गायब असल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान, याच सोसायटीतील बिल्डिंग क्रमांक ४, रूम क्रमांक १ येथे राहणारे अनिल बाबासाहेब पोफळे यांच्या मालकीची लाल रंगाची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल (क्रमांक टीएस ०९ एफक्यू ०६१७) देखील त्याच वेळी चोरीला गेल्याचे समोर आले. एकाच परिसरातून एकाच रात्री दोन मोटारसायकली चोरीला गेल्याने सोसायटीतील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चोरी झालेल्या दोन्ही मोटारसायकलींची अंदाजे किंमत ७० हजार रुपये असून, काळ्या रंगाच्या मोटारसायकलीची किंमत ३० हजार रुपये, तर लाल रंगाच्या मोटारसायकलीची किंमत ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीत पाच संशयित कैद; चोरट्यांचे धाडस वाढले!

या दुचाकी चोरीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाच संशयित व्यक्ती दोन मोटारसायकली घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सोसायटी परिसरात प्रवेश करून दुचाकी चोरल्याचे फुटेजमधून समोर येत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांमागे एक टोळी सक्रिय आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उरुळी कांचन परिसरात सलग दोन रात्री चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एकीकडे महामार्ग आणि गावातील वाहतुकीच्या समस्या, तर दुसरीकडे वाहनांच्या चोरीच्या वाढत्या घटना यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सोसायट्यांच्या आवारात हँडल लॉक करून उभ्या केलेल्या दुचाकीही सुरक्षित राहत नसतील, तर सामान्य नागरिकांनी आपली वाहने नेमकी कुठे सुरक्षित ठेवायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांनी केवळ चोरीच्या घटनांची नोंद घेऊन थांबू नये, तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन चोरीच्या घटनांचा छडा लावावा. तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवून वाहनचोरांच्या टोळीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

सलग दोन रात्री, वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना आणि सीसीटीव्हीत दिसणारे पाच संशयित; यामुळे उरुळी कांचन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. आता उरुळी कांचन पोलीस या चोरट्यांचा किती लवकर छडा लावतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व...

कदमवाकवस्तीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा कारखाना उद्ध्वस्त; ११ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ ची धडक कारवाई; एफडीए अधिकाऱ्यांच्या मदतीने छापा! ✍️...

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे!

खराडीत विनापरवाना हॉटेलमध्ये मद्यपानाचा धंदा उघड; चार हॉटेलवर पोलिसांचे छापे! FL-III परवाना नसतानाही ग्राहकांना मद्यपानासाठी जागा उपलब्ध; ५८ ग्राहकांवर कारवाई, मद्याच्या बाटल्या व रोख रक्कम...

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला!

उरुळी कांचन परिसरात वाहनांच्या बॅटरी चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला! हायवा ट्रकच्या चार आणि ट्रॅक्टरची एक अशा एकूण पाच बॅटऱ्या लंपास; सुमारे...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली...

पुढील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचे नियोजन करा; हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची आमदार माऊली आबा कटके यांची मागणी! हवेलीच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणच्या मुख्य...

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद!

पांगारे खून प्रकरणाचा सासवड पोलिसांकडून अवघ्या ७ तासांत छडा; आरोपी जेरबंद! सासवड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी; सीसीटीव्ही, तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे आरोपीचा...

error: Content is protected !!