Homeक्राईमउरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ...

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा आरोप ?

उरुळी कांचनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मारहाणीची घटना; युवकाच्या डोक्यातून रक्तस्त्राव, तरुण रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल, ११२ वर कॉल करूनही मदत वेळेत न मिळाल्याचा नागरिकांचा आरोप?

उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात सलग दुसऱ्या दिवशी भरवस्तीत मारहाणीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार (ता. ६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तुपे वस्ती परिसरात एका २५ ते ३० वर्षीय युवकाला अज्ञात व्यक्तींनी जबर मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत युवकाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.

मारहाण झालेल्या तरुणाचे नाव राम मोरया, वय 32  मुळगाव युपी, मारहाणीनंतर संबंधित युवक रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसून आल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्याचे सांगितले. मात्र, कॉल करूनही पोलिसांची मदत वेळेत घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे जखमी युवकाला नागरिकांनीच पुढील उपचारासाठी उरुळी कांचन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेमुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे,कालच सोमवार (ता. ५ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास रेल्वे नवमोरीजवळ एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पुन्हा तुपे वस्ती परिसरात मारहाणीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

“सलग दोन दिवस मारहाण; कायद्याचा धाक उरलाय का?”

उरुळी कांचन परिसरात सलग दोन दिवस भरदिवसा मारहाणीच्या घटना घडत असल्याने मारहाण करणाऱ्यांवर कायद्याचा धाक उरला आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असतील आणि नागरिकांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटत असेल, तर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, तुपे वस्ती येथील या मारहाणीमागील नेमके कारण काय, व मारहाण करणारे किती जण होते. याची स्पष्ट माहिती समोर आली नाही.

सलग दोन दिवस, भरदिवसा मारहाण… उरुळी कांचनमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!

उरुळी कांचनमध्ये व्यक्तीला अडवून सहा जणांकडून जबर मारहाण; व्यक्ती गंभीर जखमी!  ✍️ नितीन करडे उरुळी कांचन, (ता. हवेली) : उरुळी कांचन परिसरातील नऊमोरी परिसरात एका व्यक्तीला...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड;...

ड्राय डेच्या दिवशी उरुळी कांचनमध्ये दारू-ताडी विक्रीचा धुमाकूळ? राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड; ताडी विक्रीप्रकरणी कारवाई, मद्यविक्रीवरही किरकोळ कारवाई; कायमस्वरूपी दारूबंदीच्या गावातच दारू मिळतेच कशी? उरुळी...

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक!

जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाची दमदार कामगिरी; १७ वर्षांखालील मुलांचा प्रथम क्रमांक ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद...

१५ आरोपी जेरबंद; २२ गुन्हे उघडकीस, तब्बल ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; विश्रामबाग पोलिसांची कौतुकस्पद कामगिरी! ✍️ नितीन करडे पुणे : गणेशोत्सवाच्या काळात तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतील...

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग!

हवेली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत ३२९ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच पुणे जिल्हा...

error: Content is protected !!