ई व्ही एम मशीन, हटाव देश बचाव महाविकास आघाडीच्या वतीने उरुळी कांचन मध्ये निषेध व्यक्त
ई व्ही एम मशीन मुळे लोकशाहीचा घात – श्रीकांत होवाळ
उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन येथे राष्ट्रवादी काँग्रेस (श पवार पक्षाच्या ) वतीने ई व्ही एम हटाव, देश बचाव, ई व्ही एम हटाव लोकशाही बचाव, अशा घोषणा देत सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांनी मारकड वाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेचा निषेध करत अंदोलन केले. यावेळी ई व्ही एम मशीन, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांचे नामफलक जाळण्यात आले. तसेच पक्षाच्यावतीने बॅलेट पेपर वरच निवडणूक व्हाव्या अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष संदीप गोते, शहर अध्यक्ष रामभाऊ तुपे, शिवसेना (उ बा ठा) जिल्हा उपप्रमुख काळूराम मेमाणे, युवक अध्यक्ष जगदीश महाडिक, बाळकृष्ण काकडे, सनी चौधरी, सचिन बडेकर, आप्पासाहेब वाघमोडे, भाऊसाहेब कांचन, सागर कांचन, काका कांचन, नंदू मुरकुटे, दादासाहेब बडेकर, बाळासाहेब कांचन, अमृत तुपे, तुकाराम कांचन, महादेव कांचन, संतोष गायकवाड, सुभाष टिळेकर आदी पदाधिकारी कार्यकर्ते आंदोलनात उपस्थित होते.
आपण मतदान केलेलं समजायला हवं, ही डिपॅड मशीन मध्ये झालेले मतदान मोजणे गरजेचं आहे, गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देशाचे जेष्ठ नेते यांच्यावर खालच्या भाषेत टिका करने अशोभनीय व निंदनीय आहे. केलेल्या टिकेचा आम्ही निषेध करत आहे.
-रामभाऊ तुपे, उरुळी कांचन शहर अध्यक्ष-
ई व्ही एम मशीन मुळे लोकशाहीचा घात झाला आहे. ई व्ही एम मशीन ही आधुनिक मनस्मृती आहे, यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे, ई व्ही एम मशीन समूळनष्ट केल्याशिवाय, लोकशाही वाचू शकत नाही, या ई व्ही एम मशीनच्या विरोधामध्ये, देशात सर्वप्रथम बीजेपी चे सुब्रह्मन्यम स्वामी, लालकृष्ण अडवाणी, जी वी एल नरसिंहराव, हे बीजेपी चे सुप्रीम लीडर, 2013 साली सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. जर ई व्ही एम मशीन पारदर्शक आहे तर हे नेते या ई व्ही एम मशीन विरोधात सुप्रीम कोर्टात का गेले होते? यावरती माननीय सुप्रीम कोर्टाने 8 ऑक्टोंबर 2013 निकाल दिला की, देशामध्ये ई व्ही एम द्वारे निष्पक्ष, मुक्त, पारदर्शक, निवडणुका पार पडू शकत नाहीत.त्यामुळे संपूर्ण देशामध्ये VVPAT बसवण्यात याव्यात असा आदेश देण्यात आला . जर ईव्हीएम मशीन पारदर्शक असेल तर मग VVPAT संपूर्ण देशात लागू करण्याचे आदेश का दिला ? आज निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन पारदर्शक असल्याचं सांगत आहे, मग त्यांना 2013 चा सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य नाही का? संपूर्ण देश ई व्ही एम मशीन वरती संशय व्यक्त करत असताना लोकशाही टिकून ठेवण्यासाठी पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे तसेच ही घटनात्मक संस्था आहे. असे असताना सुद्धा निवडणूक आयोग लोकांच्या मनातील संशय दूर का करत नाही ? बॅलेट पेपरद्वारे निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पडू शकते, असे सर्वांचे मत झाले असताना त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना निवडणूक आयोग लोकशाही टिकवण्यासाठी तसेच संविधान वाचवण्यासाठी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक का पार पाडत नाही ? लोकांमध्ये ई व्ही एम मशीन बद्दल संशय वाढत असून लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत चालला आहे. तंत्रज्ञान मधील एक्सपर्ट एलन मस्क यांनी सुद्धा ई व्ही एम टेम्परिंग करता येते असे मत व्यक्त केलेले आहे. अशा वेळी तंत्रज्ञानाचा कोणताही अभ्यास नसणारे निवडणूक आयोग कोणत्या आधारे एवं ई व्ही एम मशीन पारदर्शक असल्याचे सांगत आहे. ई व्ही एम मशीन हटवण्यासाठी राष्ट्रव्यापी जन आंदोलनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
– श्रीकांत होवाळ, बहुजन मुक्ती पार्टी माजी प्रदेश अध्यक्ष –
