Homeक्राईमआस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व...

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल

आस्करवाडीत अवैध हुक्का बारवर छापा; ३८ हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ, चिलीम व पाईप असा ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल
✍️ नितीन करडे

पुणे : सासवड हद्दीतील आस्करवाडी (ता. पुरंदर, जि. पुणे) गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का उपलब्ध करून देत हुक्का बार चालविणाऱ्या व्यक्तीवर सासवड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई दि. ११ ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आस्करवाडी गावच्या हद्दीत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराजित सुजित मंडल (वय २७, सध्या रा. आस्करवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे, मूळ रा. राधा बल्लफपूर, बसंती, दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल) हा हॉटेलमध्ये ग्राहकांना धूम्रपानासाठी अवैधरित्या हुक्का पुरविताना तसेच हुक्का बार चालविताना आढळून आला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी ५७ हजार रुपये किमतीचे ३८ हुक्का पॉट, ५ हजार ४०० रुपये किमतीचे तंबाखूजन्य पदार्थांचे ३ डबे, ५०० रुपये किमतीच्या २० मातीच्या चिलीम, ४ हजार ५६० रुपये किमतीचे ३८ हुक्का ओढण्याचे रबरी पाईप असा एकूण ६७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन येथे अन्वये सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४(अ), २१(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी वसंत ज्ञानदेव नरळे (वय ४३, पोलीस कॉन्स) यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ६.०१ वाजता स्टेशन डायरी क्रमांक १० नुसार दाखल करण्यात आला.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्य आदेशानुसार परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी भूषण दत्तात्रय माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत गौरव गुंजेगावकर, ऋषिकेश अभंग, अक्षय देवकाते, संदीप ताडगे, अमोल देवकाते आणि लक्ष्मण पांढरे यांनी सहभाग घेतला.
पुढील तपास पोलीस हवालदार होळकर करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार कांबळे यांनी केली असून, सासवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आस्करवाडी परिसरात अवैधरित्या हुक्का बार चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध हुक्का व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले..”आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन”

कोपर्डी येथील शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व हरपले.."आदर्श शिक्षक किसन चव्हाण यांचे दुःखद निधन" वाडेबोल्हाई/पुणे:विजय लोखंडे कोपर्डी(ता.कर्जत) येथे आदर्श शिक्षक किसन काळूराम चव्हाण (वय ५६) यांचे गुरुवार,दि.६...

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास!

उरुळी कांचनमध्ये मध्यरात्री घरफोडी; सोने-चांदीसह रोकड लंपास! पांगारे वस्तीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हातात धारदार कोयता घेऊन जाताना चोरटे सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी...

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल!

कोंढवा पोलिसांची मोठी कारवाई; गांजा विक्री करणाऱ्या टोळीवर 'मोक्का' अंतर्गत गुन्हा दाखल ✍️ नितीन करडे पुणे : कोंढवा परिसरात अवैध गांजा विक्री करून दहशत निर्माण करणाऱ्या...

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले

हिंजवडीतील खूनप्रकरणातील आरोपीला उरुळीकांचन पोलिसांनी पुणे–सोलापूर महामार्गावर नाकाबंदीत पकडले ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हिंजवडी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत घडलेल्या खूनप्रकरणातील आरोपीला...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन...

उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत एटीएसची धडक कारवाई; भाडेकरूंची माहिती पोलिसांना न दिल्याप्रकरणी दोन घरमालकांवर गुन्हे ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे ग्रामीण दहशतवाद...

error: Content is protected !!