आमदार श्वेता महाले यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्याचे घेतले दर्शन
✍️नितीन करडे
फुगडी खेळ गे शिवशक्ति। हरिनामाची भक्ति
विदर्भ येथील चिखली मतदारसंघातील म्हसला बु. येथील विधानसभेच्या आमदार श्वेता महाले आणि त्यांचे पती मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले यांनी भक्तीमय वातावरणात संत ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखी सोहळ्याचे फलटण येथे दर्शन घेतले. तसेच जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली असा गजर केला.
“आनंद, उत्साह आणि खिलाडू वृत्तीचे प्रतीक म्हणजे फुगडी, हे विश्व जणू शिवशक्तीची फुगडीच आहे असे संत तुकोबाराय म्हणतात”
आमदर श्वेता महाले यांनी दिंडीला भेट देत वारकऱ्यांशी संवाद साधत वारकरी,माऊली व विद्याधर महाले यांचे सोबत फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
