Homeक्राईमवाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

✍️ नितीन करडे 

पुणे : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स इमारतीत मंगळवारी (दि. २७) सकाळी एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा विळ्याने गळा कापून निर्घृणपणे खून केला, तर मुलीवरही जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जायभाय (रा. पठाण हाईट्स, वाघोली) हे मागील आठ दिवसांपूर्वी पत्नी सोनी जायभाय व मुलांसह रफिक पठाण यांच्या इमारतीत भाड्याने राहण्यास आले होते. संतोष जायभाय यांचा मे २०१० मध्ये सोनी हिच्याशी विवाह झाला होता. ते पॉकलँड मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र, त्यांना दारूचे व्यसन असल्याने नवरा–बायकोमध्ये सतत वाद होत होते. याच कारणामुळे यापूर्वीच्या घरमालकाने त्यांना घर खाली करण्यास सांगितले होते. पतीकडून दुर्लक्ष होत असल्याने पत्नी सोनी जायभाय ही अनेक दिवस मानसिक तणावात होती. दि. २६ जानेवारी २०२६ रोजी संतोष जायभाय दारू पिऊन घरी आल्यानंतर पुन्हा पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर दि. २७ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता संतोष जायभाय पत्नीशी भांडण करून घराबाहेर निघून गेले. काही वेळाने घरातून मुलीचा जोरजोरात आरडाओरडा ऐकू आल्याने पठाण कुटुंबीय घटनास्थळी धावले. खिडकीतून पाहिले असता साईराज हा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसून आला.

यावेळी सोनी जायभाय हिने तिचा मुलगा साईराज याचा विळ्याने गळा कापून खून केल्याचे तसेच मुलगी धनश्री हिच्या गळ्यावर वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. गंभीर जखमी झालेल्या धनश्रीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात महिला आरोपी सोनी जायभाय (वय २९) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा...

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल ✍️नितीन करडे उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ चा चक्काचूर ✍️ नितीन करडे हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर पुणे | प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात...

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण ✍️ प्रतिनिधी | नितीन करडे  उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती...

उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण प्रकरण उघड; ४८ तासांत चौघे जेरबंद, १५ लाख ८०...

उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण प्रकरण उघड; ४८ तासांत चौघे जेरबंद, १५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त ✍️प्रतिनिधी | नितीन करडे उरुळी कांचन परिसरात डॉक्टरचे अपहरण...

error: Content is protected !!