पुणे बुलेटीन न्यूजचा प्रभाव !
बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाची धावपळ; रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम तातडीने सुरू
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन : हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील आश्रम रोडवरील तीन महिने पूर्वी झालेल्या डांबरीकरण रस्त्यावर पहिल्या पावसातच खड्डे पडल्याची ” पुणे बुलेटीन न्यूज ” ने बातमी झळकताच प्रशासन जागे झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींना आणि बातमीला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर संबंधित विभागाने तात्काळ हालचाल केली.
संबंधित कर्मचारी यंत्रणेसह घटनास्थळी दाखल झाले असून खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी दिलेला आवाज व “पुणे बुलेटीन न्यूज “ च्या प्रभावी वृत्तांकनामुळे रस्ते दुरुस्तीस सुरुवात झाल्याने परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “बातमी नंतर लगेच कामाला वेग आला. हेच माध्यमांचे खरे सामर्थ्य आहे.”
























