उरुळी कांचनच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी महादेव कांचन यांची निवड
✍️ नितीन करडे
उरुळी कांचन (ता.हवेली) बहुचर्चित प्रशस्त नव्याने बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामसभा पार पडली. शेवटी ग्रामसभेत मोठी गोंधळ झाला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवले असून यात महिला सभा व विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या महिला सभेनंतर दुपारी बारा वाजता विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामसभेचे विषय १) मागील सभेचा वृत्तांत वाचून दाखवणे २) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-ग्रामस्तरीय समिती सथापन करणे व अभियान राबविणे बाबत ३.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीबावत. ४.संत गाडगेवावा ग्रामस्वच्छता अभिया न समिती निवड करणेबावत ५.मा.अध्यक्ष यांच्या परवानगीने येणारे ऐनवेळचे विषय घेणे या विषयावरती विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली होती. ग्रामसभेमध्ये नागरिकांनी विविध विषयावर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामस्थ भगवान जाधव यांनी उरुळी कांचन मध्ये दारू बंदी असताना व इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत हा मुद्दा मांडून वारंवार पोलिसांकडे तक्रारी करून सुद्धा हे अवैध धंदे बंद होत नाहीत अशी विचारणा ग्रामसभेमध्ये केली.
यावेळी रामभाऊ तुपे म्हणाले की महाराष्ट्र शासनाचे ग्रामस्वराज सॉफ्टवेअर असताना हवेली तालुक्यामध्ये सर्रास खाजगी सॉफ्टवेअर वापरले जाते. त्याऐवजी ग्रामस्वराज्य हे सॉफ्टवेअर वापरावे असा ठराव पास करण्यात आला. आजच्या ग्रामसभेत बहुमताने ही ग्राम स्वराज्य सॉफ्टवेअर वापरावा म्हणून बहुमताने ठराव पास झाला. तसेच या ग्रामसभेमध्ये अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्याचे पंचनामे कालवा अस्तरीकरण स्वच्छता विविध विषयावरती चर्चा होऊन ठराव पास करण्यात आले. व मतदार यादीतील चौदाशे पन्नास नावे हरकती घेऊन कमी करण्यात आल्याबद्दल ही चर्चा आरोप प्रत्यारोपावर झाले परंतु महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवडणूक या विषयाने ग्रामसभेमध्ये मोठा गोंधळ व घोषणाबाजी करण्यात आली. यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर व आजच्या ग्रामसभेत नवीन तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्याची विषय घेण्यात आला. ग्रामसेवक प्रकाश गळवे यांनी शासनाने दिलेल्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी चे नियमाचे वाचन करून त्यामध्ये ज्यांच्याकडे पोलीस चारित्र्य पडताळणी दाखला असेल तेच या पदासाठी पात्र असतील अशी भूमिका मांडली. त्याच अनुषंगाने तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यामध्ये २ अर्जदार कागदपत्राचे पूर्तता नसल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले. व दोन अर्ज कायम करण्यात आले त्यामध्ये योगेश उत्तम कांचन व महादेव नर्सिंग कांचन या दोन उमेदवारांचे अर्ज ठेवण्यात आले. परंतु ही निवड बिनविरोध होत नसल्याने ग्रामसेवक यांनी दोघांना अर्धा तास आपल्या कार्यामध्ये बोलावून समजावून सांगितले की ही निवड बिनविरोध करा. परंतु ही निवड बिनविरोध झाली नाही व सरपंच अध्यक्ष यांनी महादेव कांचन यांच्या निवडीची घोषणा केली. व. सभा संपल्याचे जाहीर करताच त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून सर्व कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे सांगितले. संतप्त ग्रामस्थांनी ही निवडणूक लोकशाहीला धरून नसलेले आरोप करत थेट ग्रामसेवक यांच्या कार्यालयावर धडक दिली. व त्या ठिकाणी गोंधळ सृश्य परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थांनी अन्याय झाल्याच्या घोषणा देत प्रचंड घोषणाबाजी केली.
” संतप्त ग्रामस्थ थेट ग्रामसेवक कार्यालयावर धडक “
” आजची तंटामुक्त अध्यक्षपदाची निवड सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आवाजावी मतदान किंवा ग्रामस्थांचे न ऐकता सरळ दुसऱ्या उमेदवाराची निवड जाहीर केली. यामुळे ग्रामसभेचा हक्क भंग झाला आहे .हे चुकीचे आहे आम्हाला ते मान्य नसून आम्ही त्यासाठी पुढील कायदेशीर लढाई लढणार आहोत. सरपंचांनी वैयक्तिक अध्यक्ष निवडला आहे. कोणत्या कारणास्तव माझा अर्ज बाद करण्यात आला हे त्यांनी त्याचा खुलासा करावा.”
– योगेश कांचन : तंटामुक्ती अध्यक्ष पदाचे उमेदवार.
” मी स्वतः माझ्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व ही निवड ही लोकशाही पद्धतीने व पारदर्शक पद्धतीने व्हावी अशी ग्रामसभेमध्ये मागणी केली. ग्रामसभेच्या अध्यक्षा सरपंच यांनी बेकायदेशीरपणे आजची ही निवड प्रक्रिया केलेली असून यामध्ये ही निवड ग्रामस्थांमधून केली पाहिजे होती परंतु अध्यक्षांनी मनमानी करत त्यांच्या मागे कोणीही नसताना निवड जाहीर करत ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे ऐकले नाही. व सभा संपली असल्याचे जाहीर करत निघून गेल्या . ग्रामसेवकांनी दोन्ही उमेदवारांना जवळजवळ अर्धा तास बंद दाराआड चर्चेसाठी नेऊन कोणत्या अधिकारांमध्ये बंद दारावर चर्चा केल्या याचा खुलासा त्यांनी व वरिष्ठांनी करावा. चर्चेनंतर हा मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर ही साधारणतः दोन ते तीन तास ग्रामस्थ ग्रामपंचायत व सभेच्या ठिकाणी होते.”
– अलंकार कांचन: माजी तंटामुक्त अध्यक्ष उरुळी कांचन.
‘ झालेली ग्रामसभेचा इतिवत्त वृत्तांत जसा आहे तसा मी सादर करणार आहे. तंटामुक्ती अध्यक्ष पद निवडीचे सर्वस्वी निर्णय हा अध्यक्ष सरपंच यांनी जाहीर केला आहे.”
-प्रकाश गळवे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत उरुळी कांचन
” तंटामुक्ती अध्यक्ष पदी महादेव कांचन यांची निवड ही सर्वानुमते गावात वाद नको म्हणून सर्वाधिकार अध्यक्ष या नात्याने मला देण्यात आला. महादेव कांचन यांची निवड ही जनतेसमोर व ग्रामसभेत झाली आहे. तसेच मागचे तंटामुक्ती अध्यक्ष ही कायदेशीर आहेत की नाही याची माहिती आम्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे मागितलेली आहे. त्यामुळे त्यांचा निर्णय आल्यानंतर त्याचा देखील खुलासा करण्यात येईल.”
– ऋतुजा अजिंक्य कांचन, सरपंच ग्रा. उरुळी कांचन
























