Homeक्राईमउरुळी कांचन येथील सोनाराची हनीट्रॅप मध्ये लाखोंची फसवणूक 

उरुळी कांचन येथील सोनाराची हनीट्रॅप मध्ये लाखोंची फसवणूक 

नितीन करडे

पुणे – हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील सोनाराची हनीट्रॅप मधे लाखोंची फसवणूक झाली असल्याची घटना दि. 6 एप्रिल रोजी उघडकीस आली आहे. केडगाव उपनगरात राहणार्‍या महिलेने तिच्या पतीच्या मदतीने पुण्यातील उरुळी कांचन येथील रहिवासी सोनार व्यवसायिकाला ‘हनीट्रॅप’ च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून वेळोवेळी 27 लाख 56 हजार 162 रूपये घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधीत सोनाराने रविवारी (6 एप्रिल) दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल कैलास काळे व तिचा पती कैलास अंबादास काळे (दोघे रा. दुधसागर सोसायटी, गल्ली नंबर तीन, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनार व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे की, 2012 साली व्यवसायाच्या ओळखीमुळे शितल काळे हिच्याशी संपर्क आला आणि ओळख पुढे वाढत गेली. वेळोवेळी फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटीव्दारे दोघांत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. पुढे शितल हिने भावनिक ओलावा निर्माण करून शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि नंतर हे संबंध गुप्त व्हिडीओ व फोटोंच्या आधारे ब्लॅकमेलिंगसाठी वापरण्यात आले. दरम्यान, याच फोटो आणि व्हिडीओंच्या आधारे धमकावून वेळोवेळी पैशांची मागणी करण्यात आली. पार्लर उघडण्यासाठी एक लाख रूपयांची मागणी करून सुमारे 98 हजार 812 रूपयांचे साहित्य, रोख रक्कम दिली. तसेच दोन वेळा वेगवेगळ्या मोपेड गाड्याही घेतल्या. 2024 साली फिर्यादी यांनी स्वतःच्या पत्नीच्या नावावरील घर विकून 18 लाख रूपये मिळवले. यापैकी बहुतांश रक्कम शितल हिला दिली असून, त्या पैशातून तिने केडगाव उपनगरातील भुषणनगर भागात 43 लाखांचे घर खरेदी केले. त्या घरावरील कर्जाचे हप्तेही फिर्यादी यांनी भरण्याचे कबूल केले आहे. मार्च 2025 मध्ये हप्ता न भरल्यावर शितल हिने पुन्हा धमकावणे सुरू केले. आजपर्यंत फिर्यादी यांनी ऑनलाईन पध्दतीने पाच लाख 47 हजार 814 रूपये व रोख स्वरूपात 22 लाख आठ हजार 348 रूपये, तसेच दोन मोपेड गाड्या असे एकूण अंदाजे 27 लाख 56 हजार 162 रूपये शितल व तिच्या नवर्‍याला दिल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. दरम्यान, फिर्यादीने आत्महत्येचा विचार केला होता. मात्र त्यांच्या पत्नीने धीर देत घर विक्रीचा सल्ला दिला आणि हा सर्व प्रकार तिला सांगण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!