Homeमहत्त्वाचेपुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा;...

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही अडकून!

पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; तब्बल आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा; रुग्णवाहिका ही अडकून!
 महामार्गावरून विरुद्ध दिशेने वाहनांची सुसाट धाव; वाहतूक नियोजनाचा बोजवारा, अपघाताची भीती वाढली!
✍️ नितीन करडे

उरुळी कांचन प्रतिनिधी : दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या गावी गेलेले नागरिक पुन्हा कामानिमित्त पुण्याच्या दिशेने परतू लागल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे रविवार ता. १५ नोव्हेंबर रोजी वाहतूक कोंडीने अक्षरशः कहर केला होता. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून उरुळी कांचनपासून सोलापूरच्या दिशेने सहजपूर फाट्यापर्यंत चार ते पाच किलोमीटर, तर पुण्याच्या दिशेने जवळपास दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एकूण सुमारे आठ ते दहा किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे नागरिकांनी सांगितले. मॅपच्या साह्याने नागरिक दिसल तो रस्त्याचा वापर करून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे उरुळी कांचन येथील अंतर्गत रस्ते ही  जाम झाले.

मात्र, या वाहतूक कोंडीने गंभीर स्वरूप धारण केले होते. पुणे-सोलापूर महामार्गावरील गारवा हॉटेल परिसरात काही वाहनचालक वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी थेट विरुद्ध दिशेने वाहने सुसाट चालवत असल्याचे धक्कादायक प्रकार दिसुन आला . विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे समोरून येणाऱ्या वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकून पडल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच अनेक रुग्णवाहिका ही या वाहतूक कोंडीत अडकून पडल्या होत्या. तसेच वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत असतानाच आता विरुद्ध दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताची टांगती तलवार वाहनचालकांच्या डोक्यावर आहे.

विशेष म्हणजे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रभावी उपाययोजना होताना दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महामार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालायचा का? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथील वाहतूक कोंडी तातडीने सोडविण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संबंधित प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी लक्ष घालावे. ज्या डिव्हायडर ठिकाणाहून वाहने विरुद्ध दिशेला धावतात त्या चौकात वाहतूक पोलीस तैनात करून विरुद्ध दिशेने होणारी वाहनांची वाहतूक रोखावी आणि महामार्गावरील वाहतूक तातडीने सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

दिवाळीच्या सणासुदीच्या सुट्टीनंतर नागरिक मोठ्या संख्येने परतणार असल्याची पूर्वकल्पना असतानाही महामार्गावर वाहतुकीचे योग्य नियोजन का करण्यात आले नाही? वाहतूक कोंडी होणार हे माहीत असताना अतिरिक्त पोलीस बंदोबस्त का तैनात करण्यात आला नाही? असे संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात मॅफेड्रोन विक्रेत्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल...

पुणे शहरात मॅफेड्रोन विक्रेत्यांवर अंमली पदार्थ विरोधी पथकाचा छापा; ७ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त! गुलटेकडी मार्केटयार्ड परिसरात तिघांना घेतले ताब्यात; २४.६३ ग्रॅम एम.डी. मॅफेड्रोनसह...

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन जण गंभीर जखमी

उरुळी कांचनमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक; दोन गंभीर जखमी एचपी पेट्रोल पंप चौकातील अपघात; कस्तुरी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांकडून जखमींना तातडीने मदत   उरुळी कांचन (ता. हवेली) :...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता...

पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; फरार आरोपीसह अवैध दारू विक्रेता जेरबंद, ८.८६० किलो गांजा जप्त! कोंढवा, वानवडी परिसरात छापे; गांजाची किंमत...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच...

ब्रेकिंग न्यूज..! ऐन दिवाळीच्या सणात उरुळी कांचन मधे सायंकाळी मोटरसायकलवर टोळक्यांचा धुडगूस, तसेच बुलेटच्या फटाका बारचा नागरिकांना नाहक त्रास 25 ते 30 जणांची टोळी बारा ते...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी...

कोरेगाव मूळ येथील दत्त मंदिरात चोरीचा प्रयत्न; दानपेटी फोडून पैसे मोजताना संशयित चोराला ग्रामस्थांनी पकडले! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ...

error: Content is protected !!