Homeमहत्त्वाचेउरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती!

उरुळी कांचनच्या हेमलता बडेकर यांची राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती

उरुळी कांचन : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुखपदी उरुळी कांचन येथील हेमलता बाळासाहेब बडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे उरुळी कांचनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

बडेकर नगर, उरुळी कांचन, ता. हवेली येथील रहिवासी असलेल्या हेमलता बडेकर यांच्यावर राज्यभरातील महिला स्वस्त धान्य दुकानदार तसेच महिला बचत गटांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये समन्वय साधण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात राज्यभरातील महिला परवानाधारकांच्या अडचणी, स्वस्त धान्य दुकानांच्या समस्या, परवाना संदर्भातील प्रश्न तसेच शासनाच्या विविध धोरणात्मक निर्णयांबाबत महिलांच्या वतीने प्रभावीपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात मोठ्या संख्येने महिला स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. मात्र, या महिलांना परवाना, दुकान संचालन, शासकीय नियम, प्रशासकीय प्रक्रिया आणि विविध धोरणात्मक निर्णयांशी संबंधित अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महिला दुकानदारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी हेमलता बडेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

राज्यस्तरीय महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून राज्यभरातील परवानाधारक महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी पाठपुरावा तसेच परवाना संदर्भातील धोरणात्मक व शासकीय निर्णयांच्या दृष्टीने सातत्याने कार्य करण्याची जबाबदारी त्या पार पाडणार आहेत.

या नियुक्तीमुळे उरुळी कांचन परिसरातून राज्यस्तरावर महिलांच्या प्रश्नांसाठी काम करण्याची संधी हेमलता बडेकर यांना मिळाली असून, त्यांच्या नियुक्तीचे परिसरातून स्वागत होत आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कार्याचा उपयोग राज्यातील महिला स्वस्त धान्य दुकानदारांना निश्चितच होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व विविध योजनांचे शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उरुळी कांचन : (८ सप्टेंबर) उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य...

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी!

उरुळी कांचन येथे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी! ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी: उरुळी कांचन (ता. हवेली) येथे स्वातंत्र्यसंग्रामातील धाडसी क्रांतिकारक आणि आद्य स्वातंत्र्यवीर...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे...

अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सवात मोरया प्रतिष्ठान संघाची बाजी; १ लाख ११ हजार १११ रुपयांचे पारितोषिक पटकावले ✍️ नितीन...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत...

आरोग्याचा जागर अन् सामाजिक उपक्रमांचे आयोजन; सुनील (आबा) तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरुळी कांचनमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर! उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली)...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख...

उरुळी कांचनमध्ये आज रंगणार अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव २०२६; विजेत्या गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : श्रीकृष्ण...

error: Content is protected !!