Homeक्राईमजुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

✍️ नितीन करडे

पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र. ४ च्या बंद परिसरात रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी धाडसी कारवाई करत सुमारे ३ किलो गांजा, एक टोयोटा इनोव्हा कार आणि स्कूटर असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत.

शनिवार दि. १९ जुलै रोजी पोलीस हवालदार हांडे, पोलीस शिपाई बापू वाघमोडे आणि अमोल सातपुते हे रात्रगस्त करत असताना अहिल्यादेवी होळकर शाळा क्र. ४ च्या मैदानात एक चारचाकी व एक दुचाकी संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्याकडून अतिरिक्त मदत मागवली.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मोरे, पोलीस हवालदार महेश भालेराव तसेच पोलीस शिपाई दादा पावडे, कैलास केंद्रे, शंभू निरडे आणि अजय इंगोले यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.छापा टाकल्यानंतर आरोपी मयूर संजय खराडे याच्या ताब्यातील टोयोटा इनोव्हा (एमएच १२ ईटी ३९११) या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये २.०६६ किलो गांजा आढळून आला. तसेच घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपींच्या दुचाकीत ०.९६२ किलो गांजा सापडला. अशा प्रकारे एकूण सुमारे ३.०२८ किलो गांजा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींनी संगनमत करून गांजाची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने अमली पदार्थ जवळ बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २३१/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २०(ब), २०(ब)(ii) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आणि जुन्नर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र सुरुच ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या उरुळी कांचन...

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; कवडीपाट ते फुरसुंगी फाटा एक किलोमीटरसाठी दीड तास, वाहनचालक...

पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; कवडीपाट ते फुरसुंगी फाटा एक किलोमीटरसाठी दीड तास, वाहनचालक संतप्त ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी | पुणे–सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाटा...

उरुळी कांचनजवळ सिग्नलच्या वायरी कापून होस्पेट एक्स्प्रेस थांबवली; घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने मोठा...

उरुळी कांचनजवळ सिग्नलच्या वायरी कापून होस्पेट एक्स्प्रेस थांबवली; घटनास्थळी त्वरित पोलीस दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : दौंड-पुणे रेल्वे मार्गावरील...

error: Content is protected !!