Homeमहत्त्वाचेलोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक ; पण...

लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक ; पण मुख्य पुरवठादार कोण?

लोणी काळभोर पोलीस स्टेशन व अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई

लोणी काळभोर येथून ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांना अटक — पण मुख्य पुरवठादार कोण?

✍️ नितीन करडे

पुणे : पुणे शहर पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई करत ४७,२९७ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थांचा साठा लोणी काळभोर येथून जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतरही “मुख्य पुरवठादार कोण?” हा प्रश्न अनुत्तरितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र चर्चा रंगली आहे.

शुक्रवार (ता. २७ फेब्रुवारी) रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर गावातील खोकलाई देवी चौक परिसरातील पवार पान शॉप (पवार हाईट्स) येथे बेकायदेशीर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला असता, महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व पानमसाला असा एकूण ४७,२९७ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. तो तात्काळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी १) गणेश बाळू भंडलकर २) निलेश वसंत पवार (दोन्ही रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई परिमंडळ-०६ चे पोलीस उपआयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांच्या पथकासह अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी बा. औ. शिंदे (गुप्त वार्ता) व सुप्रिया जगताप यांनी सहभाग घेतला.

“किरकोळ कारवाई की मोठ्या साखळीचा फक्त एक दुवा?”

लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई होत असली, तरी नागरिकांचा सवाल कायम आहे — हा गुटखा नेमका कोठून येतो? किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई होते, पण मोठे पुरवठादार मात्र मोकाटच फिरत असल्याची चर्चा आहे.

लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत परिसरात अवैध गुटखा व नशायुक्त पान, दारू सहज उपलब्ध होत आहे ही वस्तुस्थिती लपवता येत नाही. अशी नागरिकामधे चर्चा होत आहे , शासनाने बंदी घातल्यानंतरही पुरवठा साखळी कशी कार्यरत आहे, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. अन्यथा अशा कारवाया केवळ दिखावूपुरत्या ठरतील, अशी टीका नागरिकांतून होत आहे.

मुख्य पुरवठादारांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी,  पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

सद्य कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असली, तरी “मोठे मासे” जाळ्यात अडकणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण

उरळगाव–न्हावरा परिसरातील वीजप्रश्नांना दिलासा; ५ एम.व्ही.ए. पॉवर रोहित्र व ११ केव्ही लिंक लाईनचे लोकार्पण ✍️ नितीन करडे पुणे : शिरूर-हवेली मतदारसंघातील उरळगाव, न्हावरा, आलेगावपागा व परिसरातील...

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

जुन्नरमध्ये ३ किलो गांजा जप्त; इनोव्हा कार, स्कूटरसह १०.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : जुन्नर पोलीस स्टेशन हद्दीतील अहिल्यादेवी होळकर शाळा क्र....

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन...

उरुळी कांचनमध्ये चोरांचा धुमाकूळ! महामार्गालगतची दूध डेअरी फोडून सुमारे ६० हजारांची रोकड लंपास; तीन चोर सीसीटीव्हीत कैद ✍️ नितीन करडे  उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन...

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक

पिंपळे जगताप पाझर तलावातील अज्ञात मृतदेह खून प्रकरणाचा अवघ्या तीन दिवसांत छडा; तिघांना अटक ✍️ नितीन करडे पुणे प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाझर...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र...

उरुळी कांचन येथे बँकेसमोरून लावलेली मोटारसायकल भरदिवसा चोरीला; चोर सीसीटीव्हीत कैद, परिसरातील चोऱ्यांचे सत्र सुरुच ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गालगतच्या उरुळी कांचन...

error: Content is protected !!