Homeक्राईमस्वारगेट पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोराला केले जेरबंद

स्वारगेट पोलिसांनी सराईत मोटरसायकल चोराला केले जेरबंद

✍️नितीन करडे

पुणे : स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीमध्ये गर्दीच्या ठिकाणी वाहन चोरीच्या घटना घडत असल्याने यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन सदर भागात गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त करणेबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने २३ जुलै रोजी तपास पथकातील सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पो हवा अश्रुबा गोराळे, पो अंम फिरोज शेख, हनुमंत दुधे, दिपक खेंदाड व सुजय पवार हे पेट्रोलिंग करत असताना मित्र मंडळ चौकाजवळील पी के बिर्याणी हॉटेल समोर आले असता एक दुचाकी स्वार उलट दिशेने येताना दिसला. त्यास थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव राज परमेश्वर कदम (वय २६ वर्षे) रा. आंबेडकर वसाहत लक्ष्मीनगर पर्वती गांव पुणे असे सांगितले त्याच्याकडील पॅशन गाडीचे कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर गाडी ४ ते ५ दिवसापुर्वी मित्र मंडळ चौका जवळील पुढारी ऑफिस येथुन चोरी केली असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्याचेकडे अधिक तपास केला असता त्याने गेले १० दिवसापुर्वी मार्केटयार्ड भाजीपाला मार्केटजवळुन एक एक्टिवा गाडी चोरी केली असुन ती स्वारगेट कॅनल येथे लावलेली आहे असे सांगितल्याने लगेच स्वारगेट कॅनॉल येथे जावुन पाहणी केली असता आरोपीने चोरी केलेली गाडी दाखिवली. तरी सदर आरोपीकडे तपासाअंती स्वारगेट पोलीस स्टेशन व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन कडील दाखल असलेल्या गुन्ह्यातील एकुण ५०,०००/- रुपये किंमतीच्या एक पॅशन व एक एक्टिवा गाडी अशी एकुण ०२ वाहने जप्त करण्यात आली असुन त्याचेकडुन दोन गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

“सदरची कामगिरी “

अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, रंजनकुमार शर्मा सह-आयुक्त पुणे शहर, राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मिलींद मोहिते पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ- २, पुणे शहर, राहुल आवारे सहा.पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, विकास भारमळ पो निरीक्षक (गुन्हे) यांच्या आदेशानुसार तपास पथकाचे अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा.अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, पो/अं. हनुमंत दुधे, फिरोज शेख, सुजय पवार, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, संग्राम केंद्रे, संदीप घुले, यांनी एकत्र मिळुन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल!

कचऱ्याचे साम्राज्य हटले; ‘पुणे बुलेटिन न्यूज’च्या बातमीची उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडून दखल ✍️ नितीन करडे उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) गावाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणात...

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश..

विवेक कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड; एम.पी.एस.सी.परीक्षेत यश.. -- ✍️ विजय लोखंडे  वाघोली प्रतिनिधी : लोणीकंद गावचे सुपुत्र विवेक दत्तात्रय कंद यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)...

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण !

उरुळी कांचनच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे साम्राज्य; कचरा व दुर्गंधीला नागरिक हैराण!   उरुळी कांचन प्रतिनिधी : पुणे–सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचन (ता. हवेली) गावात प्रवेश करा किंवा रेल्वेच्या...

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड

बुलेटच्या फटाक्यांच्या आवाजावर उरुळी कांचन येथे कारवाई; २४ दुचाकींवर २१ हजारांचा दंड ✍️ नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन हद्दीत...

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावरील केडगाव हद्दीत रुग्णवाहिका कंटेनरला धडकली; आजोबा-नातवाचा मृत्यू ✍️ नितीन करडे केडगाव (ता. दौंड) : लातूरहून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचारासाठी रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने...

error: Content is protected !!