Homeताज्या बातम्यावीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

वीर यात्रेदरम्यान महावितरणचा गलथान कारभार; बत्ती गुलमुळे भक्त संतप्त

✍️नितीन करडे

पुणे : वीर (ता पुरंदर) ता. 11 फेब्रुवारी रोजी वीर येथे यात्रेचा उत्साह सुरू असतानाच महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. यात्रेच्या दिवशी सायंकाळी सुमारे सात वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला असून रात्री साडे आठ वाजेपर्यंतही वीज सुरू न झाल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

आज वीर यात्रेसाठी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक आले आहेत. मात्र अचानक वीज गेल्यामुळे यात्रेच्या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले. मंदिर परिसर, रस्ते तसेच यात्रेतील प्रमुख मार्ग अंधारात बुडाले. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अशी प्रतिक्रिया भक्त विश्वजीत शिंदे यांनी दिली.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही महावितरणकडून कोणतीही तात्काळ दखल घेतली गेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही वीजपुरवठा सुरळीत करण्यात उशीर झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी मोबाईलचा टॉर्च लावून मार्ग काढत दर्शनासाठी प्रयाण केले. काही ठिकाणी स्वयंसेवकांनी देखील टॉर्चच्या मदतीने भाविकांना मार्गदर्शन केले.

मुक्कामी असलेल्या नागरिकांनी टॉर्च लावल्याने मोबाईली बॅटरी डाउन झाल्याने अनेकांचे मोबाईल बंद झाले त्यामुळे भक्तांची मोठी तारांबळ उडाली .

स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या या गलथान कारभारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमात अशा प्रकारे वीज खंडित होणे हे अत्यंत गंभीर असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोरेगाव मूळ परिसरातील चोऱ्यांचे सत्र थांबेना ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

कोरेगाव मूळ परिसरातील चोऱ्यांचे सत्र थांबेना ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  ✍️नितीन करडे उरुळी कांचन प्रतिनिधी : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक...

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी ✍️नितीन करडे उरुळी कांचन : पुणे–सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस स्टेशन समोरील...

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात

पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद मतदान गोंधळात ✍️ नितीन करडे पुणे : पूर्व हवेलीतील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान काही गावांमध्ये मतदान प्रक्रियेत...

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला

ब्रेकिंग न्यूज धक्कादायक! पूर्व हवेलीतील पंचायत समिती उमेदवाराच्या घरावर हल्ला ✍️नितीन करडे पुणे : पूर्व हवेली तालुक्यातील पेठ गाव येथे राहणारे पंचायत समितीचे उमेदवार यांच्या राहत्या घरावर...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा रूट मार्च ✍️नितीन करडे उरुळी कांचन (ता. हवेली) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित...

error: Content is protected !!