Homeताज्या बातम्याप्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर...

प्रयागधाम फाटा येथे स्कॉर्पिओचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर जखमी, स्कॉर्पिओ चा चक्काचूर

✍️ नितीन करडे

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रयागधाम फाट्याजवळ शुक्रवारी (ता. २३) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. (एम.एच. ४२ बी.एस. ३८५५) क्रमांकाच्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की स्कॉर्पिओ गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रयागधाम फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातात गाडीतील प्रवासी आत अडकले होते.

अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे चालक माऊली लाड, संतोष झोंडाडे, रत्न चव्हाण तसेच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नाने स्कॉर्पिओमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर जखमींना तातडीने कस्तुरी रुग्णवाहिकेतुन उरुळी कांचन येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अपघात नेमका कशामुळे झाला, वाहनाचा वेग किती होता, तसेच इतर कोणता दोष कारणीभूत आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या अपघातामुळे काही काळ पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा...

सावकारकी प्रकरणात बंदुकीचा धाक; जमीन बळकावल्याचा आरोप, त्रासाला वैतागून व्यावसायिकाचे विष प्राशन; चौघांविरोधात गुन्हा दाखल ✍️नितीन करडे उरुळी कांचन पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर सावकारी व अवाजवी...

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत

वाघोलीत आईकडून मुलाची गळा कापून हत्या; मुलगी गंभीर जखमी, आरोपी आई अटकेत ✍️ नितीन करडे  पुणे : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाइफ रोड, वाघोली येथील पठाण हाईट्स...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत...

उरुळी कांचन–सोरतापवाडी जिल्हा परिषद गटासाठी शिवसेना (उ बा ठा) कडून योगेश सातपुते यांना अधिकृत उमेदवारी जाहीर पुणे | प्रतिनिधी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचन–सोरतापवाडी गटात...

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण

पाच दिवसात करणी-जादूटोण्याची संशयस्पद दुसरी घटना; उरुळी कांचनमध्ये भीती, संताप आणि संशयाचे वातावरण ✍️ प्रतिनिधी | नितीन करडे  उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात पुन्हा एकदा करणी-भानामती...

उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण प्रकरण उघड; ४८ तासांत चौघे जेरबंद, १५ लाख ८०...

उरुळी कांचन परिसरातील डॉक्टर अपहरण प्रकरण उघड; ४८ तासांत चौघे जेरबंद, १५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त ✍️प्रतिनिधी | नितीन करडे उरुळी कांचन परिसरात डॉक्टरचे अपहरण...

error: Content is protected !!